news
clock
उन्हाळी सुट्ट्या सुरु होणार असल्याने  प्रभाग २१ मधील उद्यानांची तातडीने दुरुस्ती करावी, माजी नगरसेवक डब्बू आसवानी यांची मागणी

उन्हाळी सुट्ट्या सुरु होणार असल्याने प्रभाग २१ मधील उद्यानांची तातडीने दुरुस्ती करावी, माजी नगरसेवक डब्बू आसवानी यांची मागणी

उन्हाळी सुट्ट्या सुरु होणार असल्याने  प्रभाग २१ मधील उद्यानांची तातडीने दुरुस्ती करावी, माजी नगरसेवक डब्बू आसवानी यांची मागणी 

​पिंपरी, ता. १८ - प्रभाग क्रमांक २१ मधील उद्यानांची गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सुरक्षा रक्षकांचा अभाव, उद्यानांच्या आवारातच अंमली पदार्थांचे सेवन, लहान मुलांसाठीची तुटलेली खेळणी हे चित्र उद्यानांमध्ये पाहायला मिळते. आता शाळांना सुट्ट्या लागत आहेत. उद्यानांमध्ये बाळगोपाळांची गर्दी होणार आहे. उन्हाळ्यात निसर्ग, हिरवाई अनुभवण्यासाठी नागरीकांची उद्यानांमध्ये गर्दी होणार आहे. त्यामुळे, सर्वांना उद्यानात येण्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्यासाठी, आयुक्तांनी या विषयात तातडीने लक्ष घालावे व उद्यान विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी केली आहे. 

आसवानी यांनी म्हटले आहे की, उद्यानांची ही दुरवस्था पाहता प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करुनही उद्यान विभाग आणि सुरक्षा यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, “ठेकेदार उपलब्ध नाही” किंवा “निविदा प्रक्रिया सुरू नाही” अशी असमाधानकारक उत्तरे  दिली जातात. महानगरपालिका उड्डाणपुलांवरील विद्युत रोषणाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करू शकते, पण लहान मुलांच्या उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त करण्यासाठी निधी नसणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या एकेकाळी सुंदर असणाऱ्या उद्यानांची महापालिकेला योग्य देखभाल करता येत नसेल तर ही उद्याने तत्काळ बंद करावीत.

आता शाळांना सुट्ट्या लागत आहेत. उद्यानांमध्ये बाळगोपाळांची गर्दी होणार आहे. उन्हाळ्यात निसर्ग, हिरवाई अनुभवण्यासाठी नागरीकांची उद्यानांमध्ये गर्दी होणार आहे. त्यामुळे, सर्वांना उद्यानात येण्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्यासाठी, आयुक्तांनी या विषयात तातडीने लक्ष घालावे व उद्यान विभागाला सूचना द्याव्यात.  


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories