पासपोर्ट अर्जदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उद्या पुण्यात जनसंवाद सत्र

पासपोर्ट अर्जदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उद्या पुण्यात जनसंवाद सत्र

पासपोर्ट अर्जदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उद्या पुण्यात जनसंवाद सत्र 

 पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ -  पारपत्र (पासपोर्ट) अर्जदारांच्या तक्रारी आणि शंकांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रादेशिक पारपत्र कार्यालयातर्फे बुधवारी (ता. ८) जनसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील प्रादेशिक पारपत्र कार्यालय (पासपोर्ट भवन) येथे दुपारी दोन ते चार या वेळेत होणार आहे.

या सत्रामध्ये पासपोर्ट अर्जदारांना त्यांच्या अर्जाशी संबंधित अडचणी, प्रलंबित प्रकरणे, आक्षेप तसेच इतर तक्रारींबाबत प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणार आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी अर्जदारांनी दुपारी १२ वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे कार्यालयाने सांगितले आहे. 

तक्रारींचे व्यवस्थित निवारण व्हावे यासाठी अर्जदारांनी आक्षेपपत्र (ऑब्जेक्शन लेटर) आणि संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने केले आहे. तसेच, नोंदणी प्रक्रियेसाठी अर्जदारांनी दुपारी १२ वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असेही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





किवर्ड्स विथ कॉमा मराठी इंग्लिश एकत्र 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories