पालखी सोहळ्यानिमित्त आरटीओ कामकाजात बदल

पालखी सोहळ्यानिमित्त आरटीओ कामकाजात बदल

 पालखी सोहळ्यानिमित्त आरटीओ कामकाजात बदल

 पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त ९ जुलै २०२६ रोजी आरटीओ आळंदी रस्ता कार्यालय व आयडीटीआर येथील कामकाजात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

९ जुलैला आयडीटीआरकडे जाणारे मार्ग बंद राहण्याची शक्यता असल्याने चाचण्यांच्या नियोजित वेळापत्रकात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे वेळापत्रकात बदल केले आहेत. त्यानुसार, ९ जुलै रोजी वाहन तपासणी व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीचे नियमित कामकाज बंद राहणार आहे. ९ जुलैची अपॉइंटमेंट वैध राहणार असून १० ते २० जुलै दरम्यान कोणत्याही कार्यालयीन दिवशी चाचणी देता येणार आहे. वाहनचालकांनी या वेळापत्रकानुसार आपापल्या कामांचे नियोजन करावे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

असे आहेत बदल - 

🔹 ९ जुलै रोजी वाहन तपासणी व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीचे नियमित कामकाज बंद राहणार

🔹 ९ जुलैची अपॉइंटमेंट वैध राहणार

📅 पर्यायी सुविधा:

👉 १० ते २० जुलै दरम्यान कोणत्याही कार्यालयीन दिवशी चाचणी देता येणार आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories