'पीसीसीओइ'च्या माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सांगणाऱ्या 'गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार' पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
'पीसीसीओइ'च्या माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सांगणाऱ्या 'गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार' पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
पिंपरी, ता. २० - पिंपरी-पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवारी (ता. २१) महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. सकाळी १० वाजता मेळाव्याची सुरवात होईल.
यावेळी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सांगणाऱ्या 'गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार' या पुस्तकाचे प्रकाशन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीइटी) चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते होणार आहे.
या समारंभाला 'पीसीइटी'चे उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई पीसीसीओइ चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पीसीइटीचे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली आहे.
पीसीसीओई माजी विद्यार्थी संघटना आणि पीसीइटी सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्यास देश, परदेशात विविध क्षेत्रात नोकरी, उद्योग, व्यवसाय करणारे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, अमेझॉन आदी सारख्या उच्च उत्पादन कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे 'पीसीसीओइ'चे माजी विद्यार्थी, नामांकीत विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी, पीएचडी करणारे 'पीसीसीओइ'चे माजी विद्यार्थी, ज्यांनी स्वतःची कंपनी, संस्था यशस्वीरित्या स्थापन केली आहे असे उद्योजक तसेच केंद्र, राज्य सरकारी आस्थापनांमध्ये काम करणारे 'पीसीसीओइ'चे माजी विद्यार्थी आणि शिक्षण-कला-क्रीडा-आरोग्य-पर्यावरण-मॉडेलिंग-अभिनय-छायाचित्रण अशा विविध क्षेत्रातील 'पीसीसीओइ'च्या माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सांगणारे “गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार” हे पु्स्तक आहे.