news
clock
लेखक श्रीकांत चौगुले लिखित 'शिक्षणाच्या वाटेवर' पुस्तकाचे येत्या रविवारी प्रकाशन

लेखक श्रीकांत चौगुले लिखित 'शिक्षणाच्या वाटेवर' पुस्तकाचे येत्या रविवारी प्रकाशन

लेखक श्रीकांत चौगुले लिखित 'शिक्षणाच्या वाटेवर' पुस्तकाचे येत्या रविवारी प्रकाशन

पिंपरी, ता. ३१ - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध निवेदक व लेखक श्रीकांत चौगुले यांनी लिहिलेल्या 'शिक्षणाच्या वाटेवर' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या रविवारी (ता. ५) चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे सकाळी १० वाजता होणार आहे. 

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि प्रकाशक व आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सु. वा. जोशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. 

कलारंजन प्रतिष्ठान व उत्कर्ष प्रकाशन, पुणे यांनी या समारंभाचे आयोजन केले आहे. शहरातील नागरीकांनी या समारंभात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories