पिंपरी-चिंचवड जैन महासंघातर्फे अहिंसा पुरस्कारांची घोषणा, मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळा
Mar 30 2026
10
पिंपरी-चिंचवड जैन महासंघातर्फे अहिंसा पुरस्कारांची घोषणा, मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळा
पिंपरी, ता. ३० - भगवान महावीर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने २५ ते ३१ मार्च या कालावधीत अहिंसा सप्ताह साजरा केला जाणार आहे. सप्ताहामध्ये धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम सुरु आहेत. अहिंसा पुरस्कार प्रदान सोहळ्याने मंगळवारी (ता. ३१) सप्ताहाची सांगता होणार आहे.
यंदाचा अहिंसा पुरस्कार कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर, एम. ए. हुसेन, डॉ. मनोज देवळेकर आणि आनंद पिंपळकर यांना प्रदान केला जाणार आहे. शाकाहारी व्यक्ती आणि विविध क्षेत्रांतीत कर्तृत्ववान व्यक्तींना अहिंसा पुरस्काराने सन्मानित केले जाते.
येत्या मंगळवारी (ता. ३१) महावीर जयंतीच्या दिवशी आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सायंकाळी पुरस्कार प्रदान सोहळा होईल, अशी माहिती पुरस्कार समितीचे प्रमुख महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, उमेश पाटील, विलासकुमार पगारिया, श्रेयस पगारिया यांनी दिली.