तळेगाव दाभाडेमध्ये सोसायटीत लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू

तळेगाव दाभाडेमध्ये सोसायटीत लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू

तळेगाव दाभाडेमध्ये सोसायटीत लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू

पिंपरी, ता. ३० - तळेगाव दाभाडे येथील निसर्ग हौसिंग सोसायटीमध्ये  लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेत लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने सोसायटीचे चेअरमन व  ११ सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. दिनेश सुंरगे असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत, रितेश रामा सुरंगे (वय ३२, रा. किवळे) यांनी शनिवारी (ता. २८) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन पुंडलिक हिंदराव वारके (वय ४४), दीपक अशोक हेंद्रे, विनायक बाबुराव खोराटे, नीलेश बाळू गवळी, प्रवीण श्रीवास, सचिन बापू शिर्के, प्रांजली सर्वेश पिंगळे, धनश्री योगेश वैद्य, वैशाली जितेंद्र बोरकर, रामभाऊ किसन साबळे, संतोष सहादू आसवले (सर्व रा. निसर्ग हौसिंग सोसायटी, तळेगाव दाभाडे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 दिनेश लिफ्टने खाली जात असताना लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. त्याला बाहेर काढले जात असताना लिफ्टची केबल तुटली व लिफ्ट थेट खाली पडली. त्यामुळे दिनेशचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories