news
clock
महापालिका शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर

महापालिका शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर

 महापालिका शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर 

पिंपरी, ता. १४ - शहरातील अनधिकृत शाळांची यादी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या अनधिकृत शाळा इंग्रजी माध्यमांच्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, अशी स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने पालकांना दिली आहे.

महापालिका प्रशासनाने सांगितले आहे की, या शाळा गेल्या अनेक वर्षापासून सुरु होत्या. आवश्यक परवानगी, मान्यता आणि शैक्षणिक निकष पूर्ण न केल्यामुळे त्या अनधिकृत ठरल्या आहेत. यामुळे मुलांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेऊ नये. 

याबाबत बोलताना महापालिका  प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर म्हणाल्या, '' पालकांनी एखाद्या शाळेत मुलांना प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची मान्यता नक्की तपासून घ्यावी. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पुढे बोर्ड परीक्षा, दाखले आणि उच्चशिक्षणात मोठ्या अडचणी येऊ शकतात. यापूर्वी या शाळांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, तरीही त्या सुरुच राहिल्या आहेत. महापालिका प्रशासन या शाळांवर कारवाई करणार आहे. शहरातील शिक्षणव्यवस्थेत पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी ही कडक पावले उचलली जात आहेत.''

शहरातील अनधिकृत शाळांची नावे - 

- ब्लुमिंग बर्ड्स, ताथवडे

- माने इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी

- लिटिल स्टार इंग्लिश मीडियम, चिंचवडेनगर

- हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड

- गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी

- नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली

- माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली

- कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली फाटा



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories