news
clock
सांगवी ते बोपोडी पुलाच्या सुशोभीकरणाच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी करावी - मारुती भापकर

सांगवी ते बोपोडी पुलाच्या सुशोभीकरणाच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी करावी - मारुती भापकर

सांगवी ते बोपोडी पुलाच्या सुशोभीकरणाच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी करावी - मारुती भापकर 

पिंपरी, ता. १४ - नुकताच सांगवी ते बोपोडी दरम्यान मुळा नदीवर उभारलेला पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. या पुलाच्या सुशोभीकरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे. याबाबत, त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. 

निवेदनात भापकर यांनी सांगितले आहे की, संबंधित पुलासाठी सन २०२२ मध्ये सुमारे ३२ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र, काम पूर्ण होण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली तसेच खर्चातही वाढ करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे.  या पुलाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल २१ कोटी ८७ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्यात आल्याने गैरव्यवहाराचा संशय बळावला आहे. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आणि ठेकेदारांची बिले प्रलंबित असताना अशा कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे.या संपूर्ण प्रकल्पाची निविदा प्रक्रिया, मंजूर दर, अटी-शर्ती, प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी, मोजमाप पुस्तिका तसेच बिलांची पडताळणी करावी. सुशोभीकरणाच्या कामात वापरण्यात आलेले साहित्य, त्याचे बाजारभाव आणि प्रत्यक्ष खर्च यांचीही तपासणी करावी. 

या प्रकरणाची चौकशी तज्ञ अधिकाऱ्यांकडून करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अपहार झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करण्यात यावी, असे भापकर यांनी म्हटले आहे.  


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories