पिंपरी-चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सोसायटीतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य सहल

पिंपरी-चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सोसायटीतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य सहल

पिंपरी-चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सोसायटीतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य सहल

पिंपरी, ता. १३ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सोसायटीच्या वतीने सभासदांच्या घरातील महिलांसाठी शनिवारी (ता. ११) रोजी माधवबाग हॉस्पिटल, खोपोली येथे विशेष आरोग्य सहलीचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी तसेच त्यांना तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या आरोग्य सहलीमध्ये माधवबाग हॉस्पिटल, खोपोली येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्प्युटराईज्ड स्ट्रेस टेस्ट, ईसीजी (ECG),रक्तदाब, रँडम ब्लड शुगर, वजन, उंची, BMI व SpO₂ तपासणी करण्यात येणार असून पंचकर्मातील स्नेहन व स्वेदन उपचार, सात्विक आहार तसेच योग, व्यायाम आणि संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना वैयक्तिक आरोग्य सल्लाही देण्यात येणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना अल्पदरात दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सोसायटी ही संस्था केवळ मेकॅनिकल व्यवसायिकांच्या हितासाठीच कार्य करत नसून सामाजिक बांधिलकी जपत विविध आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवत आहे. वाहन दुरुस्ती व्यवसायातील कारागीर, मेकॅनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध असून भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत संस्थेचे अध्यक्ष जयवंत सावंत, उपाध्यक्ष मंगेश साहिल, कार्याध्यक्ष विश्वास दौंडकर तसेच सहकार्याध्यक्ष निलेश भोसले यांनी सांगितले की, "मेकॅनिकल क्षेत्रातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, शिक्षण व सामाजिक उन्नतीसाठी संस्था सातत्याने कार्यरत राहील. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सभासद आणि समाज यांच्यात एक सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories