क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १२ ऑगस्ट २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १२ ऑगस्ट २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १२ ऑगस्ट २०२६

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 अल्पवयीन मुलाचा विवाह लावून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वीस वर्षे नऊ महिन्यांच्या मुलाचा १८ वर्षीय मुलीसोबत विवाह लावून दिल्याप्रकरणी मंगल कार्यालयाचे संचालक, साक्षीदार आणि चार-पाच नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास आळंदी (ता. खेड) येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बिभिषण मधुकर जगदाळे (वय ४६, रा. ता. दौंड) यांनी फिर्याद दिली. अलंकापुरी मंगल कार्यालयाच्या संचालकासह निखील संभाजी साठे आणि गणेश धनंजय साठे (दोघांचेही पत्ते उपलब्ध नाहीत) तसेच चार ते पाच नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भवरापूर (ता. हवेली) येथील सिध्दार्थ सोमनाथ साठे याचे वय २० वर्षे नऊ महिने असताना त्याचा फिर्यादी यांच्या १८ वर्षीय मुलीशी विवाह लावून देण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी (ता. ११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 नेरे फाट्यावर पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा जप्त; दोघांवर गुन्हा

 नेरे फाटा (ता. मुळशी) परिसरातील दोन पान दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच शासनाने प्रतिबंधित केलेले अन्य अन्नपदार्थ असा एकूण ६ हजार ९६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन दुकानदारांविरुद्ध मुळशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता जयंत टोणपे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.४५ या वेळेत नेरे फाटा परिसरातील काळेश्वरी पान शॉप आणि कानिफनाथ पान शॉप येथे तपासणी करण्यात आली.

या कारवाईत आरोपी संतोष जगन मंजाळ याच्याकडे ३ हजार ३१४ रुपयांचा, तर रामभाऊ जिजाभाऊ थिटे याच्याकडे ३ हजार ६४८ रुपयांचा पानमसाला, सुगंधित तंबाखू व इतर प्रतिबंधित अन्नपदार्थ बेकायदेशीर विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७४, २७५ व १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), २७(३)(e), ३०(२)(a) आणि ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ ऑगस्ट रोजी रात्री सातच्या सुमारास गुन्ह्याची नोंद झाली.

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 माण येथील मेगापोलीस चौकात ३४१ ग्रॅम गांजासह तरुणास अटक

 मेगापोलीस चौक, माण (ता. मुळशी) येथील सार्वजनिक रस्त्यावर ३४१ ग्रॅम गांजासह एका २१ वर्षीय तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. अक्षय विलास नागरे (वय २१, रा. सातव वस्ती, लवळे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नागरे याच्याकडे अंदाजे ६,८०० रुपये किमतीचा ३४१ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच १४ जेसी ६६७६), पाच हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल आणि एक पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी असा एकूण ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस शिपाई ओमप्रकाश श्रीरंग कांबळे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पांचाळ करीत आहेत

-----------------------------------------------------------------------------------------------------🔴 चिखलीत मजुराला दगडाने मारहाण, दोघांवर गुन्हा

गाडीवर बसण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मजुराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने नाकावर मारून जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. ११) चिखलीतील कृष्णानगर चौक परिसरात घडली. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, विशाल येलदास काळे (वय ३७, बिगारी काम रा. भीमशक्तीनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींची नावे रोहित छोटू भोसले (वय २२, रा. विद्यानगर, चिंचवड) आणि सचिन राजपूत (वय ३५, रा. रामनगर, विद्यानगर, चिंचवड) अशी आहेत. विशाल काळे हे मंगळवारी (ता. ११) कामासाठी कृष्णानगर येथील भाजी मंडई चौकात मजूर अड्डा येथे थांबले होते. त्यावेळी आरोपी सचिन राजपूत व रोहित भोसले हे दुचाकीवरुन तिथे आले. राजपूत याने काळे यांना गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र, काळे यांनी नकार दिला. याचा राग आल्याने राजपूत याने त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रोहित भोसले याने तेथे पडलेला दगड उचलून काळे यांच्या नाकावर मारला. त्यामुळे काळे जखमी झाले. या प्रकरणी आरोपींविरोधात चिखली पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ११) भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५(२),३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 किरकोळ कारणावरुन थेरगावात पानटपरी व्यावसायिकाला मारला दगड, तरुणाला अटक

डांगे चौक परिसरात मोठमोठ्याने गोंधळ का करता, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून एका पानटपरी व्यावसायिकाला शिवीगाळ करून दगड फेकून मारल्याची मारहाण केल्याची  घटना ९ ऑगस्टला घडली. त्यामुळे पानटपरीचालकाच्या त्याच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळाला दुखापत झाली. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात २५ वर्षीय युवकाविरोधा मंगळवारी (ता. ११) गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक केली आहे.

याबाबत, पानटपरीचालक योगेश शंकर पवार (वय ३६ वर्षे, रा. खांबेटे कॉलनी, ताथवडे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. सदर घटना रविवारी (९ ऑगस्ट) थेरगाव येथील डांगे चौकातील आठवण हॉटेलजवळ घडली. आरोपीचे नाव अक्षय विठ्ठल सरवदे (वय अंदाजे २५ वर्षे, रा. थेरगाव) असे आहे. पवार हे रामलाल चौरासिया यांच्या अंडाभुर्जीच्या गाडीजवळ उभे असताना आरोपी अक्षय विठ्ठल सरवदे (वय अंदाजे २५, रा. श्वेता पार्क, सुखदा कॉलनी, थेरगाव) व त्याचा मित्र मोठमोठ्याने गोंधळ करत होते. पवार यांनी त्यांना गोंधळ का करता, अशी विचारणा केली. त्यावर सरवदे याने पवार यांच्याजवळ येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेला दगड उचलून पवार यांच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारला. यात पवार यांना दुखापत झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  या प्रकरणी मंगळवारी (ता. ११) वाकड पोलिस ठाण्यात आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(२), ३५२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 सिगारेटच्या पाकिटाचे पैसे मागितल्याने पानटपरी चालकाला मारहाण

सिगारेटच्या पाकिटाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चौघांनी पानटपरी चालकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना वाल्हेकरवाडीतील गुरुद्वारा चौक परिसरात सोमवारी (ता. १०) घडली. या वेळी आरोपींनी कोयता, हॉकी स्टिक, बादली आणि दगडाचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मंगळवारी (ता. १०) चिंचवड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राम ज्ञानोबा मुगळे (वय २०, रा. मोरया कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर घटना सोमवारी (ता. १० ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास श्री साई पान टपरीजवळ घडली. आरोपींची नावे १) ओमकार लोखंडे (अंदाजे वय २५ वर्षे), २) जसन (अंदाजे वय २५ वर्षे), ३) सुदर्शन नाकईवडे, अंदाजे वय २५ वर्षे ४) कार्तिक नायडू (अंदाजे वय २५ वर्षे सर्व रा. पुनावळे पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुगळे यांनी त्यांच्या पानटपरीवरून घेतलेल्या सिगारेटच्या पाकिटाचे पैसे मागितले. याचा राग आल्याने आरोपींनी मुगळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपी लोखंडे याने मोटारसायकलवर ठेवलेला कोयता घेतला, आरोपी जसन याने हॉकी स्टिक घेतली. सुदर्शन नाकईवडे आणि कार्तिक नायडू हेही मुगळे यांना मारण्यासाठी धावून आले. घाबरून मुगळे पळून जात असताना जसन याने त्यांच्या दिशेने बादली फेकून मारली. तसेच नाकईवडे याने रस्त्यावर पडलेला दगड मुगळे यांच्या दिशेने फेकला. हा दगड त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ लागल्याने त्यांना मुकामार लागून दुखापत झाली.

या प्रकरणी ११ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३(५), शस्त्र अधिनियम कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार नलगे करीत आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 घरपट्टीच्या भरण्याच्या कारणावरून इसमला मारहाण, चाकूने हाताच्या बोटाला दुखापत

घरपट्टी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका इसमाला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि चाकूने हाताच्या बोटावर वार करून दुखापत केली. हा प्रकार १० ऑगस्टला रात्री ८ च्या सुमारास घडली आहे. आरोपींविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ११) गुनाहा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपी धनराज आण्णाराव बिराजदार (वय ४० वर्षे, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), गणेश धनराज मुळे (वय ३० वर्षे, रा. मारुती मंदिराजवळ, शांतीनगर, भोसरी) आणि दोन अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही) आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील बळीराम आण्णाराव बिराजदार हे फिर्यादीच्या आजीला जेवणासाठी घरी घेऊन येण्यासाठी अॅक्टिव्हा दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी फिर्यादीचे चुलते व त्यांच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी घरपट्टी भरण्याच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील चाकूने बळीराम बिराजदार यांच्या डाव्या हाताच्या बोटावर वार करून दुखापत केली. याशिवाय त्यांच्या दुचाकीचेही नुकसान करण्यात आले. आरोपी धनराज बिराजदार याला पोलिसांनी अटक केली आहे. 

या प्रकरणी आरोपींविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२), ३२४ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने हल्ला, दोघे जखमी

जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादात चाकूने हल्ला करून दोघांना दुखापत केल्याची घटना १० ऑगस्टला सायंकाळी ७ च्या सुमारास भोसरी येथील शांतीनगर वसाहतीतील मारुती मंदिराजवळ घडली. या प्रकरणी मंगळवारी (ता. ११) भोसरी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत,  गणपती धनराज मुळे (वय २६ वर्षे,  ड्रायव्हर, रा. भोसरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली. आरोपी बळीराम आण्णाराव बिराजदार (वय ४५ वर्षे, रा. भोसरी), गणेश जयराम बिराजदार (वय २५ वर्षे) आणि दोन महिला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी रात्री सातच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी गणपती मुळे यांचे दाजी भाडेकरूकडून भाड्याचे पैसे आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी राहत्या घरावरून झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना (दाजींना) शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच चाकूने त्यांच्या बोटावर वार करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गणपती मुळे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन चाकूने त्यांच्या डाव्या हाताच्या दांडावर व बोटावर वार करून दुखापत केली.  

या प्रकरणी मंगळवारी (ता. ११) भोसरी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 हॉटेलमध्ये बसण्यावरून वाद, सुरीने कपाळावर वार

हॉटेलमधील चौथ्या क्रमांकाच्या टेबलजवळील भिंतीच्या कट्ट्यावर बसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका युवकाने हॉटेल व्यावसायिकाच्या कानफाडीत मारून भाजीपाला कापण्याच्या सुरीने कपाळावर वार करुन जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील हनुमानवाडी-केळगांव येथील मैफिल हॉटेलमध्ये घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

याबाबत, दत्ता चक्रधर गाढवे (वय-३० वर्ष, हॉटेल व्यवसाय, रा. ता. खेड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपीचे नाव केशव पंढरीनाथ सोळंके (वय-२६ वर्ष, रा. ता. खेड) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हॉटेलमध्ये आला आणि चौथ्या क्रमांकाच्या टेबलजवळील भिंतीच्या कट्ट्यावर बसला. त्यावेळी फिर्यादीने त्याला तेथे बसू नको, असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीच्या कानफाडीत मारली. त्यानंतर हॉटेलमधील भाजीपाला कापण्याची सुरी घेऊन फिर्यादीच्या कपाळावर वार केला. तसेच छातीवर नखांनी ओरखडे काढून जखमी केले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  या प्रकरणी आरोपीविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 मुलीला भेटण्यासाठी घरी आलेल्या पतीने ७९,५०० रुपये चोरले, गुन्हा दाखल

 मुलीला भेटण्यासाठी घरी आलेल्या पतीने पत्नी बाथरूममध्ये गेल्याचा फायदा घेत तिच्या संमतीशिवाय घरातील ७९ हजार ५०० रुपये चोरून नेल्याची घटना चिखली येथे घडली. या प्रकरणी पतीविरोधात मंगळवारी (ता. ११) चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ७.१५ या कालावधीत घडली. फिर्यादी पल्लवी बाळू महानवर (वय २३, रा. टॉवरलाइन, चिखली) यांच्या घरी त्यांचे पती ऋषीकेश बाजीराव महानवर (वय २६, रा. साने चौक, चिखली) हे मुलगी आर्वी हिला भेटण्यासाठी आले होते. मुलीशी बोलत असताना पल्लवी या बाथरूममध्ये गेल्या. त्यावेळी आरोपीने संधी साधून घरातील ७९ हजार ५०० रुपये प्रामाणिकपणाचा भंग करून चोरून नेले. याबाबत सायंकाळी ५.५९ वाजता चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -

-----------------------------------------------------------------------------------------------------

🔴 पिंपरीत पार्क केलेली ज्युपिटर दुचाकी चोरीला

लॉक करून पार्क केलेली टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पिंपरी येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रमेश खाज्जप्पा साबळे (वय ४३, रा. झुलेलाल कॉम्प्लेक्स, बी. नं. ८, फ्लॅट नं. ५४, भाटनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळे यांनी त्यांची एमएच १४ एचई ९२३६ क्रमांकाची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी ९ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास लॉक करून पार्क केली होती. १० ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय दुचाकी चोरून नेली.

याप्रकरणी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.५४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, सपोफौ बांगर (मो. ७४२००७६३५३) तपास करीत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories