news
clock
दिव्यांग बंधू-भगिनींना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी महापालिका कटिबद्ध - राणीमाई पठारे

दिव्यांग बंधू-भगिनींना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी महापालिका कटिबद्ध - राणीमाई पठारे

दिव्यांग बंधू-भगिनींना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी महापालिका कटिबद्ध - राणीमाई पठारे

पिंपरी, ता. ३० - ''शहरातील दिव्यांग बंधू-भगिनींना सक्षम करुन त्यांचे जीवन सुलभ व स्वावलंबी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध व तत्पर आहे.  दिव्यांग नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. '' असे उद्गार महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई पठारे यांनी काढले. 

 महापालिकेच्या ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’ ला पठारे यांनी शुक्रवारी (ता. २७) सदिच्छा भेट दिली. तेव्हा त्यांनी फाउंडेशनच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी माजी नगरसेविका श्रद्धा लांडगे, महिला व बालकल्याण समितीच्या सर्व सदस्या, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, पूजा भापकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सभापती राणीमाई पठारे आणि श्रद्धा लांडगे यांनी दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य सेवा, उपचार पद्धती, पुनर्वसन सुविधा आणि प्रशिक्षण उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती घेतली. या सेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार कशा करता येतील याविषयी चर्चा केली. 

दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या सुविधांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सेवा विस्तारावर अधिक भर द्यावा आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पठारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने दिव्यांग नागरीकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे पठारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories