news
clock
सोमवारी बरसलेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा

सोमवारी बरसलेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा

सोमवारी बरसलेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा 

पिंपरी, ता. ३० - उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आज, सोमवारी (ता. ३०) दुपारनंतर झालेल्या पावसाने उकाड्यापासून काहीसा दिलासा दिला. शहरात सर्वत्र ढगांच्या गडगडाटात पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्याने सायंकाळी वातावरणात गारवा पसरला. 

यंदा मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच शहरात उन्हाचा चटका जाणवत आहेत. या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरीक आणि पशू-पक्षीही त्रासले होते. हवामान खात्याने राज्यभरात पावसाचा अंदाज सांगितला होता. 

सोमवारी दुपारी हळूहळू आभाळ भरुन आले. ढगांचाही गडगडाट होत होता. साडेचारच्या सुमारास हलका पाऊस कोसळला आणि थोड्यावेळांतर पुन्हा मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. या सरींनी वातावरणात गारवा पसरला. लहान-मोठ्यांनी या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. अनेक कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन पाऊस पाहण्याचा आनंद घेतला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories