news
clock
पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे  टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे  टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  

६ एप्रिलपासून माणमध्ये स्पर्धेची सुरवात, यंदा महिला संघांचाही समावेश, भरघोस पारितोषिके

पिंपरी, ता. २८ - पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे यंदा पुरुष व महिला खुली टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून फेज - ३, माण येथील फोरस्टार क्रिकेट मैदानावर या स्पर्धेचा प्रारंभ होईल. स्पर्धा करंडकाचे अनावरण शुक्रवारी (ता. २७) रावेत येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. 

ही स्पर्धा उदयोन्मुख महिला व पुरुष खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी स्पर्धेची पूर्ण माहिती दिली. ही स्पर्धा पांढऱ्या चेंडूवर होणार आहे. यावेळी टी-२० प्रीमियर लीग नोंदणी केलेल्या एकूण ७८ महिला खेळाडू व २०३ पुरुष खेळाडू यांचे लिलाव पद्धतीने निवड करण्यात आली.पुरुष संघासाठी आठ संघमालक (प्रतीक रॉयल्स,मोरे पाटील पॅकर्स,सोनीगरा सुपर किंग्स, आसवानी डेअरडेव्हिल्स,शेट्टीज बंटस वॉरियर्स,विश्व टायगर्स,स्पोर्ट्स स्टोरीज अवेंजर्स,सह्याद्री किंग) व महिला संघासाठी चार संघमालक (ऐश्वर्याम् चॅलेंजर्स,शेट्टीज बंटस वॉरियर्स,नायर ईगलस्,ऑक्सीरीच स्पोर्ट्स) आहेत.यावेळी सर्व संघमालकांचा खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

 पुरुषांचे सामने ६ एप्रिल २०२६ पासून आणि महिलांचे सामने २२ एप्रिल २०२६ पासून सुरु होणार आहेत. 

सदर स्पर्धेत महिलांच्या विजेत्या प्रथम संघास  ७५,०००/- रुपये रोख व करंडक, द्वितीय संघास ५०,०००/- रुपये रोख व करंडक, तृतीय संघास २५,०००/- रुपये रोख व करंडक तसेच उत्कृष्ट फलंदाज रुपये ५०००/- रोख व करंडक, उत्कृष्ट गोलंदाज रुपये ५०००/- रोख व करंडक, उत्कृष्ट अष्टपैलू रुपये ७०००/- व करंडक तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुपये ५०००/- व करंडक याशिवाय प्रत्येक सामन्यास प्लेयर ऑफ द मॅच व फाइटर ऑफ द मॅच ही वैयक्तिक पारितोषके देऊन सन्मानित करण्यात येईल.

पुरुषांच्या प्रथम पारितोषिक विजेत्या संघास १५००००/- रुपये रोख व करंडक,द्वितीय संघास १०००००/- रुपये रोख व करंडक तसेच तृतीय संघास ७५०००/- रुपये रोख व करंडक तसेच उत्कृष्ट फलंदाज रुपये १००००/- रोख व करंडक,उत्कृष्ट गोलंदाज रुपये १००००/- रोख व करंडक,उत्कृष्ट अष्टपैलू रुपये ११०००/- व करंडक तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुपये १००००/- व करंडक याशिवाय प्रत्येक सामन्यास प्लेयर ऑफ द मॅच व फाइटर ऑफ द मॅच ही वैयक्तिक पारितोषके देण्यात येतील.

करंडक अनावरण समारंभाला पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, सहसचिव डॉ. दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, हर्ष नायर, विजय कोतवाल, नरेंद्र कदम, मुकेश गुजराथी, प्रदीप वाघ, अरुण जागडे, प्रशांत तेलंगे, अमित कदम, डॉ. मृदुला महाजन, सुशील जाधव, ऐश्वर्या साठे उपस्थित होते.

उदयोन्मुख खेळाडूंना एक मोठी संधी.....

 पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा नवीन उदयोन्मुख खेळाडूंना एक मोठी संधी निर्माण करतात, खेळाडूंनी या स्पर्धेला लाभ घ्यावा. या स्पर्धांद्वारे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते व ते आपल्या खेळाचा दर्जा उंचवू शकतात. - खासदार श्रीरंग बारणे

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories