पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
पिंपरी, ता. १२ - शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याशिवाय, मोकाट जनावरांचाही प्रश्न आहे. त्यामुळे, शहरात पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित तक्रारींचे वेगाने आणि प्रभावीपणे निवारण करण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय आठ स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे संपर्क क्रमांकही महापालिकेने जाहीर केले आहेत.
नागरीकांनी आपल्या प्रभागातील पशुवैद्यकीय तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक - मदनुरकर इरण्णा (अ क्षेत्रीय कार्यालय - ९१३०५८०७५१०), शरद राठोड (ब क्षेत्रीय कार्यालय - ७७७६८१२०९०), राहुल गुलाले (क क्षेत्रीय कार्यालय - ७९७२६०९२७८), निरज हटवार (ड क्षेत्रीय कार्यालय - ७०२०३१४९४३), समीक्षा कुंभार (इ क्षेत्रीय कार्यालय - ९४२१६३२५३८), सूरज शिंदे (फ क्षेत्रीय कार्यालय - ९३७०४४३८१५), निशिगंधा कचवे (ग क्षेत्रीय कार्यालय - ९२८४८०११७७) आणि सुनील कांबळे (ह क्षेत्रीय कार्यालय - ८८८८४४२०४६) यांचा समावेश आहे.