पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ 

पुणे, ता. १९ - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.  आज, मंगळवारी (ता. १९) जाहीर झालेल्या नव्या दरानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ९१ पैशांची वाढ झाली असून पेट्रोलचा दर १०६.९८ रुपयांवरुन १०७.८९ रुपये प्रति लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर ९४ पैशाची वाढ होऊन तो ९३.४५ रुपयांवरून ९४.३९ रुपये प्रति लिटर झाला आहे.

यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलमध्ये प्रति लिटर ३.१६ रुपये, डिझेलमध्ये ३.१० रुपये आणि पॉवर पेट्रोलमध्ये ३.१४ रुपयांची वाढ करण्यात आली होती.  वाढत्या महागाईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या खिशाला मोठी झळ पोचणार असल्याने नाराजी आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधनबचतीच्या आवाहनालाही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच पुन्हा इंधन दरवाढ झाल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories