फुगेवाडीतील विरका दांपत्याचा बेकायदेशीर दारुअड्डा महापालिका हटविणार

फुगेवाडीतील विरका दांपत्याचा बेकायदेशीर दारुअड्डा महापालिका हटविणार

फुगेवाडीतील विरका दांपत्याचा बेकायदेशीर दारुअड्डा महापालिका हटविणार 

पिंपरी, ता. ४ - फुगेवाडीमधील कर्नेलसिंग विरका व इंदरजीतकौर विरका या पती-पत्नीच्या दारुअड्ड्याचे बांधकाम अनधिकृत असल्याने ते पाडले जाणार आहे.  त्याबाबत महापालिकेने बुधवारी (दि. ३) दारावर नोटीस चिकटवली असून, पोलिसांचा बंदोबस्त मिळाला की ही कारवाई केली जाणार आहे.

२८ व २९ मे रोजी फुगेवाडीमध्ये हातभट्टीची विषारी दारु प्राशन केल्यामुळे  अनेक नागरीक मरण पावले. त्यानंतर, संजयनगरमधील कर्नेलसिंग विरका व इंदरजीतकौर विरकाविरका यांच्या या बेकायदेशीर दारुअड्ड्याचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली. या परिसरात तेथे विरका दाम्पत्याने वीट आणि पत्र्याचे बांधकाम करुन तिथे दारुअड्डा सुरु केला होता. हा दारुअड्डा भुईसपाट होणार आहे. 

याबाबत, बोलताना महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले की, ''महापालिकेच्या वतीने केलेल्या पडताळणीत फुगेवाडीतील संजयनगरमधील दारूअड्डा अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत तो हटवण्यासाठी बुधवारी नोटीस दिली आहे. मालकाने स्वतःहून न हटवल्यास महापालिका हा अड्डा नेस्तनाबूत करणार आहे, असे महापालिकेने दिलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.''



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories