पिंपरी विधानसभा मतदारसंघात 'SIR'मोहिमेच्या वेळापत्रकात बदल, गणना पत्रक वाटप व स्विकृती १७ ऑगस्टपर्यंत
पिंपरी विधानसभा मतदारसंघात 'SIR'मोहिमेच्या वेळापत्रकात बदल, गणना पत्रक वाटप व स्विकृती १७ ऑगस्टपर्यंत
पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) सुरु आहे. त्यानुसार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत बीएलओ (BLO)यांच्यामार्फत 'Enumeration Form' (गणना पत्रक)चे वाटप व स्विकृतीचा कालावधी होता. त्यामध्ये मा भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. 'EF फॉर्म' वाटप व स्विकृती कालावधी वाढवण्यात आला आहे.
📌 मोहिमेचे सुधारित वेळापत्रक असे -
१) ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ - बीएलओ (BLO) मार्फत 'EF फॉर्म' चे वाटप व स्वीकृती.
२) २४ ऑगस्ट २०२६ - प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी.
३) २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ - प्रारूप यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी.
४) ५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ - दावे व हरकतींवर नोटीस बजावणी आणि सुनावणी.
५) २७ ऑक्टोबर २०२६- अंतिम मतदार यादीची अधिकृत प्रसिद्धी.
''मोहिमेच्या सुधारित वेळापत्रकानुसार, 'Enumeration Form' (गणना पत्रक) वाटप व स्वीकृतीचा कालावधी फक्त ७ दिवस शिल्लक आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघातील ज्या मतदारांनी 'EF फॉर्म' (गणना पत्रक) भरून संबंधित बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांना दिला नसेल वा ज्या मतदारांचा बीएलओ (BLO) यांचेशी अद्याप संपर्क झाला नसेल अश्या सर्व मतदारांनी लवकरात लवकर आवश्यक ती माहिती व कागदपत्रासह 'EF फॉर्म' (गणना पत्रक) भरावे." असे आवाहन श्रीमती अर्चना यादव, मतदार नोंदणी अधिकारी, २०६ पिंपरी (अ.जा.) यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईलमध्ये ECINET ऍप डाउनलोड करुन आपल्या बीएलओशी संपर्क करता येईल. तसेच आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in, https://voters.eci.gov.in, वेबसाईटवर अधिक माहिती आहे.