news
clock
'चुकीच्या कामांना अंकुश हीच भाजपची कार्यप्रणाली - शत्रुघ्न काटे

'चुकीच्या कामांना अंकुश हीच भाजपची कार्यप्रणाली - शत्रुघ्न काटे

 'चुकीच्या कामांना अंकुश हीच भाजपची कार्यप्रणाली - शत्रुघ्न काटे 

पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या तब्बल ५२ कोटी रुपयांची बिलांच्या गैरव्यवहाराचा महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. शहरवासियांच्या विश्वासाला आम्ही कदापि तडा जाऊ देणार नाही. 'चुकीच्या कामांना अंकुश हीच भाजपची कार्यप्रणाली आहे.' अशी भूमिका भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मांडली. 

महापालिकेतील ५२ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीची मागणी केली. या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काटे यांनी भूमिका मांडली.  ते म्हणाले, '' राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली आणि ५२ कोटी रुपयांच्या बिलांबाबत चुकीच्या उपसूचनांवर केवळ भाजपाच्या नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत. त्यामध्ये आमच्या नगरसेवकांचा संबंध नाही, अशी भूमिका मांडली. त्याद्वारे या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, काही बिलांच्या उपसूचनांवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्याही सूचक- अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहेत. मग, त्याची जबाबदारी संबंधित नगरसेवकांची आहे, अशी भूमिका मांडणे उचित नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकीय उद्देशाने वातावरण निर्मिती करु नये.'' 


नागरीकांनी दिलेली जबाबदारी आम्ही सक्षमपणे पार पाडत आहोत....

''महापालिकेतील विविध ठेकेदारांनी ५२ कोटी रुपयांच्या बिलांसंदर्भात उपसूचनांवर नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेवून नियमबाह्यपणे बिल अदा केल्याप्रकरणी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. विधी व कायदा विभागानेही अभिप्राय नोंदवला आहे. महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपाने अर्थसंकल्पामध्ये असलेल्या त्रूटी दूर करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर आता लेखा विभागाच्या चुकीच्या कामाला प्रतिबंध करण्यात आला. पारदर्शी कारभारासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहोत.'' – भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories