पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना प्रक्रियेला वेग, प्रगणकांना सहकार्य करण्याचे नागरीकांना आवाहन

पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना प्रक्रियेला वेग, प्रगणकांना सहकार्य करण्याचे नागरीकांना आवाहन

पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना प्रक्रियेला वेग, प्रगणकांना सहकार्य करण्याचे नागरीकांना आवाहन

पिंपरी, ता. ३० - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेद्वारे जनगणनेच्या घर सूचीकरण (House Listing) टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी वेगात सुरु आहे.  १६ मे पासून सुरु झालेला हा टप्पा १४ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. घरी येणाऱ्या अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांना नागरीकांनी त्यांच्या ओळखीची खात्री करुन आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

अचूक जनगणना म्हणजे शहर विकास, प्रभावी नियोजन आणि नागरिकाभिमुख सेवांचा भक्कम पाया आहे. त्यामुळे जनगणना प्रक्रिया सुरळीत, अचूक आणि प्रभावीपणे पार पडावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून विविध भागांमध्ये पाहणी आणि कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. या पाहणीदरम्यान जनगणना प्रक्रियेची अंमलबजावणी, माहिती संकलनाची गुणवत्ता तसेच नागरिकांशी संवाद साधून प्रगणकांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत.

 पिंपरी-चिंचवड शहरात अधिकृत जनगणना कर्मचारी घरभेटीद्वारे माहिती संकलन करत आहेत. नागरिकांनी त्यांच्या ओळखीची खात्री करून आवश्यक माहिती अचूकपणे उपलब्ध करुन द्यावी आणि जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories