ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपाला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपाला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, ता. २० - ऑनलाईन औषध विक्री आणि कंपन्याच्या मोठ्या सवलतींच्या धोरणांच्या विरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स संघटनेने बुधवारी (ता. २०) पुकारलेल्या देशव्यापी संपाला पिंपरी-चिंचवडमध्ये १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील अडीच हजार औषध दुकानदार या संपात सहभागी झाले.
देशभरातील १२ लाखांहून अधिक औषध विक्रेते संपात सहभागी होऊन दुकाने बंद ठेवणार आहेत. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व स्थानिक संस्था या संपामध्ये सहभागी होत आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून केमिस्ट असोसिएशनने हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
याबाबत, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर म्हणाले, ''ड्रग्ज अॅण्ड कॉसमेटिक्स अॅक्ट १९४५ नुसार ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी नाही. तरीही ऑनलाईन औषधविक्री सुरु आहे. याला औषध दुकानदारांचा विरोध आहे. ऑनलाईन औषधविक्री हा फार्मासिस्टच्या उपस्थितीत होत नाही. नशेची औषधे, गर्भपाताची औषधे ऑनलाईन सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आरोग्याला नुकसान पोचू शकते. ऑनलाईन औषध विक्रीमध्ये मोठ्या सवलतीची आमिषे दाखवली जातात मात्र यात डुप्लिकेट औषधे असण्याचीही शक्यता आहे. यापूर्वीही केमिस्ट संघटनांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. हे थांबले पाहिजे. सरकाराने या विषयात योग्य कार्यवाही केली नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत.''
- संप यशस्वी
- Maharashtra State Chemist and Druggist Association, ड्रग्ज अँड कॉसमेटिक्स अॅक्ट
- औषध दुकानदार, Pharmacist, विवेक तापकीर, Vivek Tapkir, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन,
- पिंपरी-चिंचवड, Pimpley-Chinchwad, देशव्यापी संप, Nationwide Strike,
- ऑनलाईन औषध विक्री, Online Medicine Sale, केमिस्ट असोसिएशन, Chemist Association,