विधान परिषदेसाठी पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रसेचा दावा
पुणे, ता. २० - केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी आणि मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील जागावाटपात चढाओढ सुरु आहे. पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केला असून पिंपरी-चिंचवडला संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
माजी आमदार अनिल भोसले हे पुणे स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP)महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेस हा क्रमांक १ चा पक्ष आहे. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क आहे, असे म्हणत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे विधानपरिषदेच्या जागेवर दावा केला आहे. पिंपरी-चिंचवडला आजवर कधीच उमेदवारी न मिळालेली नसल्याने यावेळी पिंपरी-चिंचवडला उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
विधानपरिषदेवर जाण्यासाठी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे आणि भाऊसाहेब भोईर हे इच्छुक आहेत. यापैकी एकाला संधी देण्याचा आग्रह धरला जात आहे. पुण्यात महायुतीचा उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. मात्र, महायुतीमध्येही मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
- Former MLA, Local Self-Government, Constituency, Maharashtra Legislative Council, Mahayuti, Seat Allocation, Candidate,
- Pune, Legislative Council, NCP, Ajit Pawar, Pimpri-Chinchwad, Deputy Chief Minister, Sunetra Pawar, Anil Bhosale,
- विलास लांडे, योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, उमेदवार, शहराध्यक्ष, राजकीय घडामोडी
- महाराष्ट्र विधान परिषद, मतदार संघ, निवडणूक, मतदान, मतमोजणी, महायुती, जागावाटप, पक्षीय बलाबल,
- पुणे, Pune, विधान परिषद, Legislative Council, राष्ट्रवादी कॉंग्रेस, NCP, अजित पवार, Ajit Pawar, पिंपरी-चिंचवड, Pimpri-Chinchwad,
- पुणे, विधान परिषद, राष्ट्रवादी कॉंग्रेस, NCP,