माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

पिंपरी, ता. २७ - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला विचार आणि कार्यपद्धती ही आजही राज्याच्या हिताची दिशा दाखवणारी आहे.”

कार्यक्रमात सेवादलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, महिला अध्यक्षा सायली नढे, महाराष्ट्र प्रदेश युवक पदाधिकारी उमेश खंदारे, जितेंद्र छाबडा, विजय ओव्हाळ, सदाशिव तळेकर, हिराचंद जाधव, किशोर कळसकर, हरीश डोळस, किरण नढे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विलासराव देशमुख यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना विनम्र अभिवादन केले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories