पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - ४ कडून सराईत १७ गुन्हेगार हद्दपार
पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - ३ च्या पोलिस ठाण्यांकडे नोंद असलेल्या १२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये खालील १२ हद्दपार आदेश पारीत करुन या एकूण २६ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) सारंग आवाड व अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५, ५६ व ५७ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली.
सर्व तडीपार इसम सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ - ४ च्या कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसुन आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन परिमंडळ - ३ चे पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर यांनी केले आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे -
१. शिरगाव -
नागिन किशोर मैनावत राठोड, वय ३२ वर्षे रा. पुसाणे, ता. मावळ जि. पुणे. (अवैधरित्या हातभट्टीची दारु तयार करुन त्याची अर्थिक फायदयाकरीता विक्री करणे यासारखे ०४ गुन्हे दाखल आहेत.)
२. चिखली -
योगेश दिनेश सावंत, वय ३३ वर्षे, रा. इंद्रायणी हौ. सोसा. वंदेमातरम चौकाशेजारी, रुपीनगर, तळवडे, पुणे. (अपहरण करुन खुन करणे, मारहाण करुन गंभीर जखमी करणे, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी करणे, यासारखे ०३ गुन्हे दाखल आहेत.)
३. चिखली -
सनी ऊर्फ नकुल अनिल कुचेकर, वय २५ वर्षे, रा. राजवीर मेडीकल समोर, शिवगणेशनगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे. (अपहरण करुन खुन करणे, चोरी करणे, लाथाबुक्यानी व पाईपने मारहान करुन दुखपत करणे मारहाण करणे, यासारखे ०३ गुन्हे दाखल आहेत)
४.
चिखली -
राजकुमार उत्तम हिरवे, वय ३९ वर्षे, रा. फ्लॅट नं. १०२, आई सोसायटी, डी २३ घरकुल चिखली, पुणे. (शस्त्र ने वार करुन जखमी करणे, महिलेस अश्लील शिवीगाळ अश्लील हावभाव करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे दहशत करणे यासारखे ०२ गुन्हे दाखल आहेत)
५. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी -
गणेश ऊर्फ गणी रामचंद्र नाणेकर रा, वय ३१ वर्षे, रा. नाणेकरवाडी, जुन्या ग्रामपंचायतीच्या मागे, चाकण ता. खेड, जि. पुणे. (दगडाने मारहाण करुन दुखापत करणे, विनापरवाना पिस्टल बाळगणे, महिले बरोबर इच्छेविरुध्द शरीरसंबंध ठेवणे, यासारखे १३ गुन्हे दाखल आहेत)
०२ वर्षे करीता पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण.
६. उत्तर महाळुंगे एमआयडीसी -
विकास रामभाऊ आवारी, वय २३ वर्षे, रा. देवतोरणे, पाईट, ता. खेड, जि. पुणे. (धारदार शस्त्राने व लाथाबुक्कांनी मारहाण करुन शिवीगाळ करणे, पाईपने मारहाण करुन दुखापत करणे, धारदार शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी करणे, यासारखे ०३ गुन्हे दाखल आहेत.)
७. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी -
अमोल नंदाराम तांबे, वय ३४ वर्षे, रा. काठापुर, शिरुर, जि. पुणे. (महिले बरोबर इच्छेविरुध्द शरीरसंबंध ठेवुन बलत्कार करणे, विनयभंग करणे, यासारखे ०२ गुन्हे दाखल आहेत)
८. चिखली - १) स्वप्निल बाळासाहेब राक्षे, वय २६ वर्षे, रा. चक्रधर किराणा स्टोअरचे बाजुला भांगरे कॉलनी, पाटीलनगर, चिखली, पुणे. (टोळी प्रमुख).
२) वैभव कृष्णा पाटील, वय २२ वर्षे, रा. शिवसाई हौ. सोसा, घर नं. १२ तुकारामनगर, तळवडे, पुणे. (टोळी सदस्य)
३) रवीराज प्रदिप सुरवसे, वय २९ वर्ष, रा. रिव्हर रेसींडन्सी जाधववाडी, चिखली, पुणे. (टोळी सदस्य)
०२ वर्षे करीता पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण.
(टोळी प्रमुख व त्यांचे सदस्य हे परिसरात पसरवण्यासाठी हातात कोयता फिरवुन फिर्यादीस कोयत्याने जीवे मारण्याचे उद्देशाने वार करणे, मारहाण करुन दहशत करणे, यासारखे ०२ गुन्हे दाखल आहेत)
९. देहुरोड -
अनिकेत/छोट्या संतोष विटकर, वय २१ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, पाण्याच्या टाकीजवळ, देहगांव, ता. हवेली, जि. पुणे. (शस्त्राने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, वाहन चोरी करणे, यासारखे ०४ गुन्हे दाखल आहेत.)
१०. दक्षिण महाळुंगे - अक्षय नाथा कोळेकर, वय २७ वर्षे, रा. धामणे, ता. खेड, जि. पुणे. (विनापरवाना पिस्तुल बाळगणे, मारहाण करणे, यासारखे ०२ गुन्हे दाखल आहेत.)
०३ महिने करीता पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण.
११. देहुरोड -कार्तिक सुनिल कुभांर, वय २३ वर्षे, रा. दत्त मंदीरामागे, आंबेडकरनगर रोड, देहुरोड, पुणे. (जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणे, मारहाण करुन जखमी करणे, अंमली पदार्थ (गांजा) बेकायदेशीररित्या विक्री करणे यासारखे ०४ गुन्हे दाखल आहेत.)
१२.
तळेगाव दाभाडे - ऋषिकेश अनंता नवले, वय २२ वर्षे, रा. शेरे, ता. मावळ, जि. पुणे. (खुन करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे व दहशत करणे यासारखे ०२ गुन्हे दाखल आहेत)
१३. तळेगाव दाभाडे -
निलेश खंडु गायके, वय ४० वर्षे, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे, (खुन करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण व चोरी करण यासारखे ०३ गुन्हे दाखल आहेत.)
खालापुर तालुक्यातुन
१४. देहुरोड -
राहुल महादेव बालघरे, वय ३४ वर्षे रा. सव्र्व्हे नं. ७३, आदर्शनगर, किवळे, पुणे. (अवैधरित्या देशी/विदेशी दारु अर्थिक फायदयाकरीता विक्री करणे यासारखे ०५ गुन्हे दाखल आहेत.)
१५. देहरोड -
विघ्नेश हनुमंत येळवंडे, वय ४० वर्षे रा. निघोजे, ता. खेड पुणे. (विनापरवाना लोखंडी पिस्टल/काडतुसे बाळगणे, मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देण यासारखे ०३ गुन्हे दाखल आहेत.)