रावेतमधील ए जे फर्निचर मॉलवर शुक्रवारी रात्री गोळीबार, हल्लेखोर पसार, पोलिसांचा तपास सुरु

रावेतमधील ए जे फर्निचर मॉलवर शुक्रवारी रात्री गोळीबार, हल्लेखोर पसार, पोलिसांचा तपास सुरु

 रावेतमधील ए जे फर्निचर मॉलवर शुक्रवारी रात्री गोळीबार, हल्लेखोर पसार, पोलिसांचा तपास सुरु 

लॉरेन्स बिश्नोई गँगने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिष्णोई याच्या नावाने ऑडिओ क्लिप व्हायरल


पिंपरी, ता. १६ -  पुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याची घटना अगदी ताजी असतानाच, रावेत परिसरात काल, शुक्रवारी रात्री गोळीबाराचा थरार घडला आहे.  रात्री ९.२४ च्या सुमारास रावेतमधील ए. जे. फर्निचर मॉलवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मॉलच्या काचा व नावाच्या प्लेटवर पाच-सहा गोळ्या झाडल्या. या घटनेत जिवीतहानी झालेली नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांनी शहरवासियांमध्ये भिती व चिंतेचे वातावरण पसरले आहे.   

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिस आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटेजमध्ये दुचाकीवरुन आलेले दोन आरोपी गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहेत. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोर वेगाने पसार झाले आहेत. 

या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर याने सोशल मीडियावर (फेसबुक) पोस्ट शेअर करुन स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये ए. जे. फर्निचर मॉलचे मालक  मालक अशोक नैन अंमली पदार्थ (एमडी ड्रग्स) आणि हवाला व्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवाय, "हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात घालू.", अशी थेट धमकीही देण्यात आली आहे.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य म्हणून ओळखला जाणारा शुभम लोणकर याने फेसबुक पोस्टद्वारे स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये  ए. जे. फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप करत "हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल," अशी थेट धमकी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिष्णोई याच्या नावाने ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. "जो आमच्या विरोधात जाईल, त्याची आणि आमची लवकरच भेट होईल," असा इशारा या ऑडिओमध्ये दिल्याचे बोलले जात आहे. पोलिसांकडून सदर सोशल मिडीया पोस्ट व ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची पडताळणी करत आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories