मोबाईल चार्जर देण्यास नकार दिल्याने मेडिकल दुकानदाराला मारहाण

मोबाईल चार्जर देण्यास नकार दिल्याने मेडिकल दुकानदाराला मारहाण

मोबाईल चार्जर देण्यास नकार दिल्याने मेडिकल दुकानदाराला मारहाण 

पिंपरी, ता. १९ - मेडिकल दुकानदाराने मोबाईल चार्जर देण्यास नकार दिल्यामुळे त्याला मारहाण केल्याचा प्रकार संभाजीगर-चिंचवड येथील प्राईम मेडिको येथे रविवारी (ता. १७) सायंकाळी ७ च्या सुमारास घडला. पोलिसांनी आरोपींना नोटिस देऊन सोडले आहे. 

मेडिकल दुकानदार विजय लादाराम चौधरी (वय- २३ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी बबलु म्हस्के (वय ३० वर्षे रा. चिखली, आदिनाथ गायकवाड (वय २८ वर्षे रा. चिखली व नवनाथ वाघमारे (वय ४३ वर्षे, रा. चिखली) यांना पोलिसांनी नोटिसवर सोडले आहे.  फिर्यादी विजय त्यांच्या मेडिकल शॉपवर काम करत असताना वरील तीन अनोळखी आरोपींनी त्यांना मोबाईल चार्जर मागितले. विजय यांनी चार्जर दिले नाही. त्याचा राग आल्याने आरोपींनी विजय यांना हातातील स्टिलच्या कडयाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

आरोपींविरोधात निगडी पोलिस ठाण्यात बी.एन.एस कलम ११८ (१), ३५२, ३५१, (२) ११५ (२) ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories