महापालिका सर्वसाधारण सभा - गळ्यात नकली नोटांचा हार घालून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे यांची प्रशासनावर टिका
Mar 13 2026
49
महापालिका सर्वसाधारण सभा - गळ्यात नकली नोटांचा हार घालून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे यांची प्रशासनावर टिका
पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज, शुक्रवारी (ता. १३) भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रणकंदन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी गळ्यात नकली नोटांचा हार घालून प्रशासनावर सडकून टिका केली.
सभेला येताना बनसोडे यांनी गळ्यात नकली नोटांचा हार घातला होता. शहरात सुरु असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ त्यांनी हा हार प्रशासनाला भेट दिला. बनसोडे म्हणाले, ''महापालिकेत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून भ्रष्टाचार सुरु असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. मागे राहिलेल्या चोरांना आवर घाला. जर, पैसेच हवेत तर हा हार घ्या.'' असे म्हणत त्यांनी प्रशासनाला लक्ष्य केले.
तत्कालीन आयुक्तांवरही निशाणा साधत प्रशासनाने भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बनसोडे यांनी केली. बनसोडे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.