शहरातील पेट्रोल पंप नियमित सुरु, अनावश्यक गर्दी टाळावी, पेट्रोल डीलर असोसिएशनची माहिती

शहरातील पेट्रोल पंप नियमित सुरु, अनावश्यक गर्दी टाळावी, पेट्रोल डीलर असोसिएशनची माहिती

शहरातील पेट्रोल पंप नियमित सुरु, अनावश्यक गर्दी टाळावी, पेट्रोल डीलर असोसिएशनची माहिती 

पिंपरी, ता. १९ - पिंपरी-चिंचवड शहरातील ८० टक्के पेट्रोल पंप बंद असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या सर्व चर्चा केवळ अफवा आहेत. शहरातील पेट्रोल पंप नियमित सुरु आहेत, अशी माहिती  पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली आहे.  नागरीकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा व पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी , असे त्यांनी सांगितले आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून शहरात इंधन तुटवडा निर्माण होणार, तसेच अनेक पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. या चर्चांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

याबाबत स्पष्टीकरण देताना ध्रुव रुपारेल म्हणाले,  “पिंपरी-चिंचवड शहरातील ८० टक्के पेट्रोल पंप बंद असल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. काही ठिकाणी तांत्रिक किंवा स्थानिक कारणांमुळे एखादा पेट्रोल पंप तात्पुरता बंद असू शकतो. मात्र, शहरात इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून कोणतीही टंचाई नाही.”

प्रशासनाकडूनही नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहनही असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories