शहरात १५६ गुन्हयांमधील जप्त केलेले एकूण २ कोटी ६४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट, पोलिसांची कार्यवाही
शहरात १५६ गुन्हयांमधील जप्त केलेले एकूण २ कोटी ६४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट, पोलिसांची कार्यवाही
पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडील १५६ गुन्हयांमधील जप्त करण्यात आलेले एकूण २ कोटी ६४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये दाखल असलेल्या एन.डी.पी.एस. गुन्हयांमधील मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस अधिकाऱ्यांच्या समितीने एकूण १५६ गुन्हयामधील जप्त ३१५ किलो ग्रॅम गांजा, ७६१ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, १२ किलो अफुची झाडे, ३०० ग्रॅम ब्राउन शुगर, १०९ किलो डुडा असे एकूण २ लाख ६४ लाख १३ हजार ७१०/- रुपये किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले आहेत. या कार्यवाहीमध्ये पोलिसांसमवेत प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा - पुणे, राज्य उत्पादन शुल्क - पुणे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ - पुणे यांचे प्रतिनिधी असे राजंणगाव एम. आय डी.सी. मधील महाराष्ट्र एनव्हिरो पॉवर लिमिटेड येथे प्रत्यक्ष उपस्थित होते.
सदरची कार्यवाही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, शशिकांत महावरकर (सह पोलिस आयुक्त),सारंग आवाड (अपर पोलिस आयुक्त), रोहिदास पवार (पोलिस उप आयुक्त गुन्हे), संदीप आटोळे (पोलिस उप आयुक्त, परिमंडळ - १), प्रविण बा. मोरे (सहाय्यक पोलिस आयुक्त - गुन्हे २) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे महेश पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), स्वप्निल चव्हाण (सहायक पोलिस निरीक्षक), शकुर तांबोळी (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक), पोलिस हवालदार ज्ञानेश्वर मुळे, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, पोलीस शिपाई संतोष स्वामी, रणधीर माने, कपिलेश इगदे, चंद्राकांत जाधव, संतोष सपकाळ, गोविंद डोके यांनी केली आहे.
