news
clock
पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - २ कडून सराईत १९ गुन्हेगार तडीपार

पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - २ कडून सराईत १९ गुन्हेगार तडीपार

पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - २ कडून सराईत १९ गुन्हेगार तडीपार

पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - २ च्या पोलिस ठाण्यांकडे नोंद असलेल्या १२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.  जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये खालील १२ हद्दपार आदेश पारीत करुन या एकूण १९ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. 

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे)  सारंग आवाड व अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५, ५६ व ५७ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. 

सर्व तडीपार इसम सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ - २ च्या कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे.  हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसुन आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन परिमंडळ -  १ चे पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे. 

 हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे - 


१. काळेवाडी - आकाश चंद्रवदन जगदाळे, वय ३० वर्षे, रा. जय मल्हार नगर कॉलणी क्र. ०३, थेरगांव, पुणे (अवैध रित्या जुगार खेळणे, मारहाण करणे. अवैधरित्या शस्त्र बाळगणे, एकुण ०३ गुन्हे)


२.हिंजवडी - नरेंद्र सुभाष नट वय २८ वर्षे, रा. गणेश मंदिराजवळ गवारवाडी पॉवर हाऊस जवळ, फेज ०३ माण ता. मुळशी जि. पुणे (अवैध रित्या दारु विक्री करणे एकुण ०३ गुन्हे)

३. रावेत - प्रेम सुंदर मारवाडी, वय २७ वर्षे रा. आयशोरामसोसायटी जवळ, रावेत पुणे (टोळी प्रमुख),  अविनाश बरमा मारवाडी, वय ४५ वर्षे रा. सदर (टोळी सदस्य),  पायल बलबिर कर्मावत, वय २५ वर्षे, रा. सदर (टोळी सदस्य),  उर्मिला विष्णु कर्मावत, वय २३ वर्षे, रा. सदर (टोळी सदस्य), निर्जना प्रेम मारवाडी, वय २७ वर्ष, सदर (टोळी सदस्य),  नेहा सागर कर्मावत, वय २१ वर्षे, रा.सदर (टोळी सदस्य) (अवैध रित्या दारु विक्री करत आहे. एकुण ०३ गुन्हे)


४. काळेवाडी - अक्षय चिमाजी ढवळे, वय २३ वर्षे, रा. कैलासनगर, पुरबजी सुपर मार्केट समोर, थेरगांव, पुणे (मारहाण करणे, दंगा करणे, जबरी चोरी करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे एकुण ०३ गुन्हे)

५. हिंजवडी -  रोहित फुलचंद भालशंकर, वय २२ वर्षे, रा. राज वॉशिग सेंटर शेजारी, जाधव नगर, सिंहगड रोड, वडगाव बु// जि. पुणे (मारहाण करणे, दंगा करणे, जबरी चोरी करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे एकुण ०३ गुन्हे)


६. रावेत - अविनाश विजय बोरगे, वय ३४ वर्षे, रा. बोरगेवाडा, बुध्दविहार शेजारी, पुनावळे गावठाण, पुणे (अवैधरित्या दारु विक्री करणे एकुण ०५ गुन्हे)

सहा महिने पिंपरी चिंचवड/पुणेशहर / पुणे ग्रामीण

७. रावेत - जरनैलसिंग धरमसिंग बोपाराय, वय ४५ वर्षे, रा. बी/३०४ फेज-१ सिलॅस्टीयल सिटी, रावेत, पुणे (मारहाण करणे. एकुण ०३ गुन्हे)

एक वर्ष पिंपरी चिंचवड/पुणेशहर / पुणे ग्रामीण

८. बावधन - टोळी प्रमुख- राहुल सुरेश गोणते वय २४ वर्ष, रा. अतश्री समर्थ पुर्वा सोसा. फलॅट नं. ४०१, दौलत पेट्रोल पंपामागे, भुगाव ता. मुळशी जि.पुणे.,  टोळी सदस्य अविनाश ऊर्फ आव्या रोहिदास सातपुते वय ३१ वर्ष रा. स.नं. २६३/२, फलॅट नं. ०३, शिवम हिल व्हयु सोसा. दौलत पेट्रोल पंपामागे, भुगाव ता. मुळशी जि. पुणे., प्रदिप मारुती खराडे, वय २९ वर्षे, सुमन संस्कृती सोसा. हिरा गार्डन जवळ, भुकूम ता. मुळशी, जि. पुणे,  राजेश वसंत जांभुळकर, वय २८, रा. दत्तवीला सोसा. माजीरेनगर, भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे. (मारहाण करणे, दंगा करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे एकुण ०२ गुन्हे)

९. काळेवाडी - आकाश चंद्रवदन जगदाळे, वय ३० वर्षे, रा. जय मल्हार नगर कॉलणी क्र.०३, थेरगांव, पुणे (मारहाण करणे, दंगा करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे एकुण ०३ गुन्हे)

१०. हिंजवडी - कांतीलाल मिड्डुलाल नट, वय ३९ वर्षे, रा. एच पी सिमेंट प्लॉटजवळ, बुचडेवस्ती, मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे (अवैध रित्या दारु विक्री करत आहे. एकुण ०४ गुन्हे)

११. बावधन - साहिल संजय मराठे, वय २३ वर्षे, रा. प्लॅट नं.३०२ स्काश आय फस्ट सोसायटी, भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे (जबरी चोरी करणे, मारहाण करणे शस्त्राचा धाक दाखवुन पैसे काढुन घेणे, अवैध रित्या दारु विक्री करत आहे. एकुण ०४ गुन्हे)

१२. वाकड - दत्तमंदिर रोड, वाकड, पुणे नागेश बाबु भंडारी, वर्षे २५ वर्षे, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, (चाकु, सु-या यासारख्या घातक शस्त्राचा धाक दाखवुन पैसे काढुन घेत असतो तसेच अवैध रित्या अंमली पदार्थ विक्री करत आहे. एकुण ०३ गुन्हे)



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories