पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - १ कडून सराईत १४ गुन्हेगार तडीपार
पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या परिमंडळ - १ च्या पोलिस ठाण्यांकडे नोंद असलेल्या १२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये खालील १२ हद्दपार आदेश पारीत करुन या एकूण १४ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) सारंग आवाड व अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५, ५६ व ५७ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली.
सर्व तडीपार इसम सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ - १ च्या कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसुन आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन परिमंडळ - १ चे पोलीस उप आयुक्त संदिप आटोळे यांनी केले आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे -
१) चिंचवड - रोहित दत्ता धावरे, वय २० वर्षे, रा. कुपरकोपरा आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे. (जबरी चोरी करणे तसेच विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणे असे ०२ गुन्हे दाखल आहेत.)
२) संत तुकारामनगर - जावेद मुसा कुरेशी, वय ४४ वर्ष रा. आण्णासाहेब मगर नगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे. (खुनाचा प्रयत्न करणे, स्फोटक पदार्थाद्वारे नुकसान करणे, दुखापत करणे, प्राण्यांना क्रुरतेने वागविणे, लोकांना धमकाविणे व बेकायदेशीर रित्या घातक शस्त्रे बाळगणे असे ०५ गुन्हे दाखल आहेत )
३)निगडी - रवी नरसप्पा रेड्डी वय २८, रहाणार सहयोगनगर तळवडे, ता. हवेली जिल्हा पुणे. (चोरी करणे, खूनाचा प्रयत्न करणे तसेच जातीवाचक शिवीगाळ करणे असे ०४ गुन्हे दाखल आहेत.)
४) निगडी - संतोष ऊर्फ ऐंक्या सिध्दु पवार, वय २८ वर्षे, रा. रुम नंबर ३६, बिल्डींग नंबर १०, जय बजरंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड, पुणे (टोळी प्रमुख),
करण ऊर्फ राजु ज्ञानदेव तिरकर वय-२३ वर्ष रा.रुम नं.४७ बि.नं.९ मल्हार हौ. सोसा. अजंठानगर चिंचवड पुणे (टोळी सदस्य), रामा नंदु कुऱ्हाडे वय १९ वर्ष रा. बजरंग हौ. सोसा. बि.नं.७ बाळु मामा मंदिराजवळ अजंठानगर चिंचवड पुणे (टोळी सदस्य)
(टोळी प्रमुख व त्यांचे सदस्य परीसरात दहशत माजविण्यासाठी बेकायदेशीर रित्या घातक शस्त्रे बाळगणे, लोकांना मारहाण करणे, चोरी करणे, स्त्रीयांचा विनयभंग करणे असे एकुण एकत्रीत ०४ गुन्हे दाखल आहेत.)
५) गोपाळ अकुंश हळनोर, वय २५ वर्षे रा. सी-१९/४०१ जयगणेश हौ. सोसा. घरकुल, चिखली, पुणे. (बेकायदेशीर रित्या घातक शस्त्रे बाळगणे, घातक हत्याराने दुखापत करणे, दमदाटी करणे असे ०४ गुन्हे दाखल आहेत.)
६) सांगवी - विघ्नेश गुणशिलन रंगम, वय २५ वर्षे, रा. कृष्णाई निवास, गंगोत्रीनगर लेन नं.२, पिंपळे गुरव, पुणे. (जबरी चोरी करणे, विनापरवाना पिस्टल बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे असे ०४ गुन्हे दाखल आहेत)
७) दापोडी - अभिषेक राजू चव्हाण वय ३२ वर्ष रा. वार्ड नं-३ जयभिमनगर दापोडी पुणे. ( दरोडा टाकणे, खून करणे, गंभीररित्या जखमी करणे, दारू विक्री करणे असे ०४ गुन्हे दाखल आहेत.)
८) संत तुकारामनगर - कार्तिक श्रीनिवास शिंगाडे, वय २१ वर्षे, रा. भागवत गिता मंदिराजवळ, खराळवाडी, पिंपरी, पुणे. (विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे असे एकुण ०२ गुन्हे दाखल आहेत.)
९) पिंपरी - उज्वल विनोद लव्हे वय २२, रा. साबळे यांचे धरासमोर रमाबाईनगर, पिंपरी पुणे (गंभीररित्या जखमी करणे, विनापरवाना घातक शस्त्रे जवळ करणे असे ०४ गुन्हे दाखल आहेत.)
१०) पिंपरी - गौरव महेश वाल्मीकी ऊर्फ कजानिया, वय २७ वर्षे, रा. वरयानी
दवाखान्याजवळ निराधारनगर, पिंपरी, पुणे. ( संघटीत गुन्हेगारी मध्ये सामील असून, स्त्रीयाची छळवणूक करणे, दुखापत करणे, धमकावणे, अंमली पदार्थाची विक्री करणे, अंमली पदार्थ जवळ बाळगणे असे ०५ गुन्हे दाखल आहेत.)
११) पिंपरी -सचिन शिवाजी सुर्वे, वय ३४ वर्षे, रा. भीमनगर, पिंपरी, पुणे. (खुनाचा प्रयत्न जबरी चोरी करणे, दंगा करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे तसेच विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे ०२ गुन्हे दाखल आहेत.)
१२) निगडी - रितेश पोपट सोनवणे, वय २२ वर्षे, रा. रुम नं. १०९ माता रमाई हौसिंग सोसा. ओटास्किम निगडी, पुणे. (चोरी करणे, धमकी देणे विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे ०३ गुन्हे दाखल आहेत. )