वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांकडून सहा महिन्यांत एकूण ४० कोटी ८३ लाखांचा दंड वसूल

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांकडून सहा महिन्यांत एकूण ४० कोटी ८३ लाखांचा दंड वसूल

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांकडून सहा महिन्यांत एकूण ४० कोटी ८३ लाखांचा दंड वसूल 

पिंपरी, ता. १४ जुलै २०२६ -  पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतूकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण ४० कोटी ८३ लाख २९ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीमध्ये  ४ लाख १ हजार ७८७ वाहनचालकांवर करण्यात आली आहे. 

 पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार पोलिस सह आयुक्त शशीकांत महावरकर व अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांच्या सूचनांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुक शाखेमार्फत ही कारवाई करण्यात आली.

कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे -फॅन्सी नंबर प्लेट लावणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, सिग्नल जम्पींग करणे, ट्रिपल सिट प्रवास करणे, काळ्या काचा लावणे, मॉडीफाईड सायलेंसर लावणे, हेल्मेट न घालणे, वाहतूकीस अडथळा करणे याबाबतीत ही कारवाई करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या बसेस व रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच टोईंग कारवाईतही दंडाची आकारणी करण्यात आली आहे.  

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरीकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करुन त्यांच्यावर होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी तसेच नागरिकांनी ट्राफिक बडी वॉट्सअॅप चॅट बॉट क्रमांक ८७८८६४९८८५ याचा वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन व इतर वाहतूक विषयक समस्या सोडविण्याकरीता जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories