पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ - सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागांत वाहतूक कोंडी तसेच पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. आपली सुरक्षितता हीच सर्वात मोठी जबाबदारी आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत सूचनांचे पालन करा, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
वाहतूक संथ गतीने सुरु असलेले मार्ग, पाण्याखाली गेलेले पूल याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे व नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
🔶 वाहतूक संथ गतीने सुरू असलेले मार्ग:
• पुणे–मुंबई नवीन महामार्ग
• Pune–मुंबई जुना महामार्ग
• पुणे–नाशिक महामार्ग
• चाकण–शिक्रापूर महामार्ग
🌊 पाण्याखाली गेलेले पूल:
• मोरया गोसावी पूल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड
• आळंदी येथील इंद्रायणी जुना पूल
• आळंदी येथील इंद्रायणी नवा पूल
• दाभाडे सरकार पूल
⚠️ महत्त्वाच्या सूचना:
• तीर्थक्षेत्र आळंदी येथे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
• पुणे–मुंबई महामार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही दिशेतील वाहतूक बंद असून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना
✅ चौक, बसस्टॉप, पूल, पादचारी मार्ग किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी वाहने पार्क/थांबवू नका.
✅ विरुद्ध दिशेने वाहन चालवू नका; लेन शिस्त पाळा.
✅ जड वाहने रस्त्याच्या कडेला उभी करू नका.
✅ बस, रिक्षा व कॅब चालकांनी चौक व स्टॉप लाईनवर वाहने थांबवू नयेत.
✅ दुचाकीस्वारांनी वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर वाहन थांबवू नये.
✅ शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा.
✅ पादचाऱ्यांनी पादचारी मार्गाचाच वापर करावा.
✅ शाळा, बाजारपेठ, बसस्टॉप व रुग्णालय परिसरात सावकाश वाहन चालवा.
✅ वाहतूक नियमांचे आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा.