शासनाकडून महत्त्वाचे आवाहन - भाविकांनी आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये
Jul 06 2026
27
शासनाकडून महत्त्वाचे आवाहन - आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये
पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ - सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन शासनाने केले आहे.
शासनाने सांगितले आहे की, कृपया प्रशासन, पोलिस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे.

- सूचना, वारकरी, Warkari, भाविक, Pilgrims, आषाढी वारी, Ashadhi Wari, Wari 2026, आळंदी प्रवेश बंद, Alandi Entry Restricted, चारही पूल बंद, All Four Bridges Closed, Bridges Closed,
- पूरस्थिती, Flood Situation, मुसळधार पाऊस, Heavy Rain, अतिवृष्टी, Very Heavy Rain, शासनाचे आवाहन, Government Appeal, Public Advisory
- आळंदी, Alandi, इंद्रायणी नदी, Indrayani River, इंद्रायणी पूर, Indrayani Flood