प्रभाग क्रमांक ११ - जॉगर्स पार्कमधील अनधिकृत बांधकाम भुईसपाट
पिंपरी, ता. २० - प्रभाग क्रमांक ११ मध्ये जॉगर्स पार्क उद्यानात माजी महापौर मंगला कदम यांच्या पुढाकारातून अनिधकृत बांधकाम सुरु होते. प्रभाग क्रमांक ११ मधील चारही नगरसेवकांनी या बांधकामाला विरोध केला होता. या बांधकामावरुन लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरु होता. हे बांधकाम थांबवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले होते. या बांधकामाविरोधात काल मंगळवारी (ता. १९) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात काल तिथे आंदोलनही केले होते. प्रशासनाने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेऊन आज, बुधवारी (ता. २०) सकाळी हे बांधकाम भुईसपाट करायला सुरवात केली आणि काही तासांतच हे बांधकाम भुईसपाट करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका योगिता नागरगोजे सांगितले होते की, ''जॉगर्स पार्कमध्ये माजी महापौर मंगला कदम व नगरसेवक कुशाग्र कदम यांच्या पुढाकाराने अनधिकृत बांधकाम सुरु आहे. गेले पाच महिने हे काम सुरु आहे. जॉगर्स पार्कमध्ये दररोज सकाळी व सायंकाळी नागरीक व्यायामासाठी येतात. पोलिस भरतीसाठी तयारी करणारे तरुण इथे व्यायामासाठी येतात. इथे जैवविविधता आहे. आम्ही याबाबत अतिक्रमण विभागाला व उद्यान विभागाला पत्र दिले ते एकमेकांवर जबाबदारी ढकलतात. आता आम्ही महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले आहे. मंगला कदम यांनी दुसऱ्या प्रभागात हस्तक्षेप करु नये. ''
माजी महापौर मंगला कदम यांनीही या बांधकामावरुन योगिता नागरगोजे यांच्याविरोधात घोषणा देत आमदार महेश लांडगे यांना बडबड केली होती. गेले चार दिवस शहरात याच विषयाची चर्चा होती. नागरीकांचाही उद्यानातील अनधिृकत बांधकामाला विरोध होता. काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलन करुन, ''प्रशासनाने जर हे अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर आम्हीच आंदोलन करुन हे बांधकाम हटवू.'', अशी रोखठोक भूमिका घेतली होती. परिणामी, प्रशासनाने अखेर प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्कमधील हे बांधकाम भुईसपाट करायला सुरवात केली.