वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल
वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २० - वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी व देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत या महिला गैरवर्तन करताना आढळल्या आहेत.
पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी चौकातूकडून शगुन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिटी प्लाजा समोर एक महिला मंगळवारी (ता. १९) गैरवर्तन करत होती. तर देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारीच (ता. १९) किवळे पुलाजवळ द्वारका लॉजसमोर दोन महिला व लेखा फार्म जवळ स्वर्ग डॉजसमोर दोन महिला गरैवर्तन करत होत्या.
या महिला वेश्याव्यवसाय करण्याचे उद्देशाने शब्दोच्चार करुन, डोळयाने खुणवून, हाताने लैंगिक हावभाव करुन सार्वजनिक ठिकाणी येणारे-जाणारे लोकांना अडथळा निर्माण करत होत्या. त्यांच्या या गैरवर्तनामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होत होता.
दोन्ही ठिकाणी आढळून आलेल्याया महिलांवर पिंपरी व देहूरोड पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सार्वजनिक शिष्टाचार, Public Decency, सभ्यता भंग, Violation of Decency, लैंगिक हावभाव, Sexual Gestures, अडथळा निर्माण, Obstruction,
- अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, Immoral Traffic Prevention Act, कलम ८, Section 8,
- , वेश्याव्यवसाय, Prostitution, गुन्हा दाखल, FIR Filed,
- महिला गैरवर्तन, Women Misconduct, सार्वजनिक ठिकाण, Public Place,
- पिंपरी, Pimpri, देहूरोड, Dehuroad, पोलिस ठाणे, Police Station