प्लॉट खरेदीच्या व्यवहारात ग्राहकाची अडीच लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. ११ - प्लॉट खरेदीच्या व्यवहारात एका ग्राहकाची २ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत आरोपी पुर्णचंद्र स्वैन (रा. अशोक नगर, लिंक रोड, पिंपरी) याच्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. ९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी जितीन भोसले यांना मौजे-डोणे (ता. मावळ) येथील प्लॉट ४,९८,२४०/- रुपये किंमतीला विकत द्यायचे ठरवले होते. त्याप्रमाणे वेळीवेळी फिर्यादी यांनी चेकद्वारे २,७०,०००/- रुपये आरोपीला दिले. त्यानंतर, आरोपीने सामंजस्य करार (एमओयु) केला पण त्यामध्ये जाणुनबुजून फसवणुक करण्याचे उद्देशाने मौजे-डोणे येथील प्लॉटचा सर्वे गट नंबर नमूद केला नाही. केवळ प्लॉट नं. २८१ असे मोघम नमूद केले. फिर्यादी भोसले यांना सदर प्लॉट खरेदीखताद्वारे विकत दिला नाही व फिर्यादीकडून घेतलेले पैसे न देता त्यांच्या पैशाचा अपहार करुन त्यांची २,७०,०००/- रुपयांयी फसवणूक केली आहे
आरोपीविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३१६(२),३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आर्थिक नुकसान, Financial Loss, ग्राहक हक्क, Consumer Rights, संपत्ती फसवणूक, Property Fraud, नागरीक सुरक्षा, Citizen Protection
- जमीन व्यवहार, Land Deal, खरेदी करार, Sale Agreement, सामंजस्य करार,
- , जितीन भोसले, Jitin Bhosale, हिंजवडी पोलीस ठाणे, Hinjewadi Police Station, मौजे-डोणे, Mauje Done,
- पिंपरी, Pimpri, प्लॉट खरेदी, Plot Purchase, फसवणूक, Fraud, ग्राहक फसवणूक, Customer Scam