बनावट माल प्रकरणी पिंपरी बाजारपेठेत पोलिस आणि कॉपीराइट विभागाचा छापा

बनावट माल प्रकरणी पिंपरी बाजारपेठेत पोलिस आणि कॉपीराइट विभागाचा छापा

बनावट माल प्रकरणी पिंपरी बाजारपेठेत पोलिस आणि कॉपीराइट विभागाचा छापा

पिंपरी, ता. ३१ -  काळेवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी PUMA कंपनीच्या बनावट बुटांच्या विक्रीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर सोमवारी (ता. ३०) पोलिस आणि कॉपीराइट विभागाने पिंपरी कॅम्प परिसरात साई चौक परिसरातील कपड्यांच्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईचा विरोध करत दुकानदारांनी दुपारी एक ते सायंकाळी साडेचारपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली.

सोमवारी दुपारी प्रशासनाने पिंपरी बाजारातील रेडिमेड कपड्यांच्या दुकानात कारवाई सुरु केली. याची माहिती बाजारपेठेत पसरताच लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, दुकानदार त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी प्रशासन व व्यापाऱ्यांत शाब्दिक बाचाबाची झाली. या कारवाईदरम्यान बनावट मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस संबंधित दुकानदारांकडे चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

'' प्रशासनाच्या कारवाईमुळे बाजारातील व्यापाऱ्यांत प्रशासनाच्या विरोधात नाराजी आहे. बाजारपेठ बंद ठेवावी लागल्याने  व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. '' असे  पिंपरी चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष

धनंजय आसवानी यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories