नामांकीत कंपनीच्या नावे बनावट मालाची विक्री, १३ लाख ४८ हजार रुपयांचा माल जप्त
पिंपरी, ता. ३१ - शाओमी कंपनीच्या चिन्हाचे बनावट डिस्प्ले, मोबाईल कव्हर, चार्जर कोणतीही परवानगी न घेता विकले जात असल्याचा प्रकार पिंपरी येथील डिलस्क मॉलमध्ये रविवारी (ता. २९) उघडकीस आला आहे. पोलिसांनी एकूण १३ लाख ४८ हजार /- रुपये किंमतीचा बनावट माल जप्त केला.
या प्रकरणी, विनोद बिजल सुमरा, वय ४९ वर्षे, धंदा नोकरी (फिल्ड ऑफिसर NETRIKA Consulting India pvt ltd) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपींमध्ये १) सावलाराम सुजाराम चौधरी (वय २८ वर्षे), २) जेपाराम बाबुराम चौधरी (वय २९ वर्षे),
३) हरिष फयाजी माली (वय ३४ वर्षे), ४) प्रविण बद्रीसिंग राजपुरोहित (वय ३० वर्षे), ५) भरत आसाराम प्रजापती (वय २३ वर्षे), ६) मुकेश लालाराम चौधरी (वय ३० वर्षे), खेसाराम देवाराम प्रजापती (वय ३८ वर्षे) व
८) रतनसिंग गिसुसिंग राजपुरोहित (वय ४३ वर्षे) यांचा समावेश आहे. आरोपींचा मोबाईल अॅक्सेसरीज विक्रीचा व्यवसाय आहे.
आरोपींनी त्यांच्या दुकानांमध्ये Xiaomi Technology Private Limited या कंपनीच्या नावाने व चिन्हाचा गैरवापर करून बनावट डिस्प्ले, मोबाईल कव्हर्स आणि चार्जर विक्रीस ठेवत होते. यासाठी त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती.
पोलिसांनी आरोपींना भा.ना.सु.संहिता कलम ३५(३) प्रमाणे नोटीस दिली आहे. त्यांच्याविरोधात कॉपीराईट अॅक्ट सन १९५६ चेकलम ५१, ६३, ६४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.