news
clock
जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडल्याने महिलेला ५ लाखांचा फटका

जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडल्याने महिलेला ५ लाखांचा फटका

 जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडल्याने महिलेला ५ लाखांचा फटका 

पिंपरी, ता. ११ - जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडल्याने एका महिलेची ५ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. २१ ऑगस्ट २०२४ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी विनोद चौहान याच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या फसवणुकीबाबत संबंधित महिलेने तक्रार दिली आहे. आरोपी विनोद चौहान (रा. चंदीगढ पंजाब - पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने जास्त पैशाचा परतावा देतो असे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादी महिलेकडून वेळोवेळी ५,१०,००० रुपये घेतले. या रक्कमेवर जादा परतावा दिला नाही आणि फिर्यादीची मूळ रक्कमही परत दिली नाही. 

आरोपीविरोधात निगडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(२), ३१८ (४) नुसार शनिवारी (ता. ९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories