news
clock
मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सोसायटीतील सुरक्षा रक्षकाला अटक

मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सोसायटीतील सुरक्षा रक्षकाला अटक

मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सोसायटीतील सुरक्षा रक्षकाला अटक

 पिंपरी, ता. ९ - पिंपरीमधील एका उच्चभ्रू सोसायटीतील सुरक्षारक्षकानेच तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन केले. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीचा सुरक्षारक्षक म्हणून सोसायटीत कामाचा पहिलाच दिवस होता.  दिनेश चौधरी (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. 

त्याने सोसायटीत राहात असलेल्या सहा, आठ व दहा वयाच्या तीन मुलींना, 'तुम्हाला पाण्याची टाकी दाखवतो' असे सांगून इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. तिथे त्याने त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. यामुळे पिडीत मुली घाबरल्या होत्या. 'हा प्रकार कुणाला सांगितला, तर मारून टाकू,' अशी धमकीही त्याने दिली. मात्र, दहा वर्षीय मुलीने धाडसाने पुढे येत ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पालकांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतल्याने गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याप्रकरणी दहा वर्षीय पिडीत मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जामदार यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार, शुक्रवारी (ता. ८ मे) दुपारी सोसायटीत शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी (वय २५) याने तीन मुलींना गाठले. ‘तुम्हाला टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो,’ असे आमिष दाखवून तो या चिमुरड्यांना बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार कोणाला सांगितला तर मारुन टाकेन, अशी धमकीही या सुरक्षा रक्षकाने मुलींना दिली होती. आरोपीच्या या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने न घाबरता घरी पोहोचताच आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीने दाखवलेल्या या धैर्यामुळे हा गंभीर गुन्हा उघडकीस आला.पालकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories