पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यात विविध करारांवर स्वाक्षरी
पुणे, ता. २२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पाच देशांचा दौरा करुन दिल्लीमध्ये परतले आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात ऊर्जा, संरक्षण आणि खनिज क्षेत्रांतील करार झाले.
15 मे पासून सुरु झालेल्या या परदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट दिली.
संयुक्त अरब अमिरातीत भारताने धोरणात्मक पेट्रोलियम साठे, दीर्घकालीन एलपीजी पुरवठा, संरक्षण आणि नौवहन क्षेत्रातील करार केले.
अबुधाबीने भारतात ५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली.
नेदरलँड दौऱ्यात भारताने संरक्षण, महत्त्वपूर्ण खनिजे आणि इतर प्रमुख क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी १७ करार केले.
स्वीडन सोबत व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा झाली.
नॉर्वे सोबत 'ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप' बाबत करार झाला.
इटली दौऱ्यात पंतप्रधानांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा केली.