पिंपरीमध्ये घातक शस्त्र बाळगणाऱ्या युवकाला अटक
पिंपरी, ता. 22 - पिंपरीतील हिन्दुस्तान अँटीबायोटीक कंपनीच्या मोकळ्या मैदानात पोलिसांनी धारदार लोखंडी शस्त्र (सत्तूर) बाळगणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी अक्षय शिवाजी साळुंखे (पोलीस शिपाई, संत तुकारामनगर पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोहसीन समीर सय्यद (वय २५, रा. रुम नं. २१, पपया चाळ, खराळवाडी, पिंपरी) याने घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेशाचा भंग करुन धारदार लोखंडी सत्तूर आपल्या ताब्यात ठेवले होते. आरोपी हा कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तिथे थांबलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१) व १३५ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.