news
clock
पावसामुळे  प्रचंड पाणी तुंबल्याने पुणे महापालिका प्रशासन 'अलर्ट'

पावसामुळे प्रचंड पाणी तुंबल्याने पुणे महापालिका प्रशासन 'अलर्ट'

पावसामुळे  प्रचंड पाणी तुंबल्याने पुणे महापालिका प्रशासन 'अलर्ट' 

शहरात पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून (ता. ६) कामे सुरु केली जाणार

पुणे, ता. ४ - गुरुवारी झालेल्या पावसाने पुण्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबले त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शुक्रवारी (ता. ३) पुणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागासह अन्य विभागांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ''प्रशासन पारंपारिक पद्धतीने गेले अनेक वर्ष काम करत आहे. आता पावसाचे बदलते स्वरुप लक्षात घेऊन  कार्यपद्धती बदलणे आवश्यक आहे. तेव्हाच नागरिकांना दिलासा देता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत." असे महापौरांनी सांगितले. 

महापौरांनी दिलेल्या सूचनांनुसार, शहरात पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून (ता. ६) कामे सुरु केली जाणार आहेत. धोकादायक झाडांच्या फांद्या तातडीने कापण्याच्याही सूचना दिल्या आहेत. या बैठकीला आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता दिनकर गोजारे, उपायुक्त माधव जगताप उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत महापौर नागपुरे म्हणाल्या, "पुण्यास सलग दोन दिवस मोठा पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी मी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. कमी कालावधीमध्ये मोठा पाऊस झाल्याने पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी यापूर्वीही आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन जूनपूर्वी यंत्रणा सज्ज करण्याचे, नाले सफाईचे आदेश दिले होते. मात्र, हा पाऊस अचानक आल्याने शहरात २६० ठिकाणी पाणी तुंबले. त्यापैकी २२७ठिकाणे धोकादायक असून, त्यातील १२० ठिकाणी जूनपूर्वी कामे केले जातील. त्यामुळे त्या भागात पाणी तुंबणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच ओढे-नाल्यांच्या कडेला उभी राहिलेली अनधिकृत बांधकामे असून, त्यावरही कारवाईचे आदेश दिले आहेत." 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories