पुणे महानगरपालिकेतर्फे लहानग्यांसाठी  वारी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

पुणे महानगरपालिकेतर्फे लहानग्यांसाठी वारी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

पुणे महानगरपालिकेतर्फे लहानग्यांसाठी  वारी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन 

पिंपरी, ता. १० जुलै २०२६ -  महाराष्ट्राची समृद्ध संतपरंपरा, वारकरी संस्कृती आणि भक्तीभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित वारी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. 

या स्पर्धेत आपल्या लहानग्यांचा उत्साहाने सहभाग नोंदवावा. वारी परंपरा, वारकरी संस्कृती, संतांचे जीवन, महाराष्ट्राची लोककला आणि सकारात्मक मूल्यांवर आधारित सर्जनशील वेशभूषेतून आपल्या कल्पकतेची अनोखी छाप उमटवावा. वारकरी संस्कृतीचा अभिमान जपूया... संस्कार, सर्जनशीलता आणि भक्तीभावाची परंपरा पुढे नेऊया. असे महापालिकेने आवाहन केले आहे. 

स्पर्धेची थोडक्यात माहिती

स्पर्धेचा कालावधी - ५ जुलै २०२६ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत

🏆 आकर्षक बक्षिसे (प्रत्येक वयोगटासाठी)

🥇 प्रथम – ₹10,000

🥈 द्वितीय – ₹7,000

🥉 तृतीय – ₹5,000


👧 सहभागी वयोगट:

• गट अ: ० ते ५ वर्षे

• गट ब: ६ ते १० वर्षे

• गट क: ११ ते १६ वर्षे

📲 छायाचित्रातील QR Code स्कॅन करून आजच नोंदणी करा आणि आपल्या छोट्या वारकऱ्यांना या प्रेरणादायी स्पर्धेचा भाग बनवा. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories