आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पुणे मेट्रोच्या विशेष सेवेला प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद

आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पुणे मेट्रोच्या विशेष सेवेला प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद

आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पुणे मेट्रोच्या विशेष सेवेला प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद

 ९ जुलैला एका दिवसात ३,५२,६०६ प्रवाशांनी केला मेट्रोने प्रवास 

पिंपरी, ता. १० जुलै २०२६ -  संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त पुणे मेट्रोने सुरु केलेल्या विशेष सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  ९ जुलै २०२६ रोजी अवघ्या एका दिवसात ३,५२,६०६ प्रवाशांची नोंद झाली. हा आकडा पूर्वीच्या सर्वाधिक प्रवासी संख्येच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवणारा आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली. 

पालखी सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने विशेष सेवांबरोबरच अतिरिक्त गाड्या सोडल्या होत्या. पालखी सोहळा अनुभवण्यासाठी असंख्य शहरवासियांनी काल मेट्रोतून प्रवास केला. यातील अनेकजण पहिल्यांदाच मेट्रोमध्ये बसले होते. मट्रोचा सुखकर प्रवास अनुभवून सर्व प्रवासी समाधान व्यक्त करत होते. 

प्रवाशांना मदत, मार्गदर्शन करण्यासाठी स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. गर्दीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले. यामुळे सर्वांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित झाला. शहरवासियांसोबतच काही वारकऱ्यांनीही मेट्रोचा प्रवास अनुभवला. प्रवाशांनी  पुणे मेट्रोला दिलेल्या प्रेमाबद्दल मेट्रो प्रशासाने प्रवाशांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories