'पीएमपी'कडून येत्या मंगळवारपासून 'डबलडेकर' बसची चाचणी

'पीएमपी'कडून येत्या मंगळवारपासून 'डबलडेकर' बसची चाचणी

 'पीएमपी'कडून येत्या मंगळवारपासून 'डबलडेकर' बसची चाचणी 

पिंपरी, ता. १५ जुलै २०२६ - पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमल) येत्या मंगळवारपासून (ता. २१)  पुण्यातील १० मार्गावर डबलडेकर बसची चाचणी घेतली जाणार आहे.  ज्या मार्गावर बीआरटी व मेट्रो नाही त्याच मार्गावर डबलडेकर बस धावणार आहे. 

 स्विच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पीएमपीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. चाचणीसाठी सोमवारी (ता. २०) एक बस उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले असून २१ जुलैपासून चाचणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या वेळी पीएमपीच्या अधिकाऱ्यांसोबतच स्विच कंपनीचे अधिकारीदेखील उपस्थित असणार आहेत.

सप्टेंबर २५ मध्ये हिंजवडी भागात डबलडेकर बसची चाचणी झाली. तिथे आता मेट्रोची सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे, तिथे 'पीएमपी'ला प्रवाशांचा प्रतिसाद कमी लाभण्याची शक्यता आहे. चाचणी दरम्यानही अडचणी आढळल्या. त्यामुळे, प्रशासनाने चाचणीसाठी आता नव्या मार्गांची निवड केली आहे. 

याबाबत बोलताना 'पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड म्हणाले, ''डबलडेकर बसची नव्याने चाचणी घेतली जाणार आहे. ज्या भागात मेट्रो व बीआरटी नाही अशा भागात ही बस चालवली जाईल. त्यामुळे बीआरटी व मेट्रो नसलेल्या मार्गावर डबलडेकरची चाचणी होणार आहे.''



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories