'पीएमपीएमएल'च्या कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले योगाभ्यासाचे महत्त्व

'पीएमपीएमएल'च्या कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले योगाभ्यासाचे महत्त्व

 'पीएमपीएमएल'च्या कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले योगाभ्यासाचे महत्त्व 

पुणे, ता. ५ - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी योगाभ्यासाचे महत्त्व जाणून घेतले. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट मुख्यालयात बुधवारी (ता. ३) नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे यांच्या सहकायनि कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय योग व हास्ययोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सदर कार्यक्रमास पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. विजयकुमार सरनाईक, मुख्य अभियंता मा. राजेश कुदळे, प्रशासन अधिकारी मा. संतोष किरवे तसेच नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी एकपात्री कलाकार व लाफ्टर योगा ट्रेनर मकरंद टिल्लू यांनी उपस्थितांना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे तसेच हास्ययोगाच्या माध्यमातून तणावमुक्त जीवनशैली कशी अंगीकारता येते याबाबत मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांनी नियमित योगाभ्यास करुन निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले. 

अशा आरोग्यवर्धक उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असल्याचे नमूद केले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व हास्ययोगाच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड यांनी केले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories