'पीएमपी'चा उपक्रम - सवलतीचा बस पास आपल्या दारी,  लाभ घेण्याचे संस्थांना आवाहन

'पीएमपी'चा उपक्रम - सवलतीचा बस पास आपल्या दारी, लाभ घेण्याचे संस्थांना आवाहन

 'पीएमपी'चा उपक्रम - सवलतीचा बस पास आपल्या दारी,  लाभ घेण्याचे संस्थांना आवाहन 

पिंपरी, दि. ३ जुलै २०२६ -  पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) सवलतीचा बस पास सुविधा आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

'पीएमपी'चे  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड साहेब यांच्या संकल्पनेतून हा  उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत 'पीएमपीएमएल'चे पथक शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्यूट, अकॅडमी तसेच विविध संस्थांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना सवलतीच्या बस पासबाबत माहिती देत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे ऑन-द-स्पॉट बस पास अर्ज स्वीकारून पास वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या उपक्रमाला शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्यूट, अकॅडमी तसेच विविध संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी, पालक, प्राचार्य, संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

यापूर्वी विद्यार्थी व पालकांना बस पास मिळविण्यासाठी पीएमपीएमएलच्या पास विभागात जावे लागत होते. मात्र, आता ही सेवा थेट शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याने विद्यार्थी व पालकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.

ज्या शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्यूट, अकॅडमी किंवा इतर शैक्षणिक संस्थांना हा उपक्रम त्यांच्या परिसरात आयोजित करावयाचा असेल, त्यांनी 'पीएमपीएमएल'च्या पास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :- श्री. गणेश शिंदे, पास विभाग प्रमुख - ९८८१३३०९४०, ०२० - २४५०३२३६


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories