पुणे महानगर परिवहन महामंडळांच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडसाठी मागण्या, आमदार शंकर जगताप व स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांची उपस्थिती

पुणे महानगर परिवहन महामंडळांच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडसाठी मागण्या, आमदार शंकर जगताप व स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांची उपस्थिती

पुणे महानगर परिवहन महामंडळांच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडसाठी मागण्या, आमदार शंकर जगताप व स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांची उपस्थिती  

पुणे, ता. २८ - पुणे महानगर परिवहन महामंडळच्या  (PMPML)बससेवेबाबतच्या विविध प्रश्नांबाबत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. आमदार शंकर जगताप व पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी शहरातील पीएमपीच्या सेवेबाबत महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटाव्यात, यासाठी पीएमपीएल प्रशासन तत्परतेने काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्या अशा....

१) श्री मोरया गोसावी, देहू, आळंदी, शिरगाव, भंडारा डोंगर यांसारख्या प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणारे 'धार्मिक यात्रा मार्ग' सुरु करावेत.

२) पिंपरी-चिंचवड हद्दीतील नादुरुस्त बसथांब्यांची दुरुस्ती करावी आणि नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस तातडीने सुरु कराव्यात.

३) बीआरटी मार्ग आणि कनेक्टिंग असलेले रस्ते यामध्ये वारंवार अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बीआरटी मार्गांमध्ये खाजगी वाहतूक होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमपीएल प्रशासन आणि वाहतूक विभाग यांनी समन्वय साधून धोरण निश्चित करावे. 

४) कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसची प्रलंबित रक्कम व निवृत्त कर्मचाऱ्यांची अंतिम देणी लवकरात लवकर मिळावीत. वैद्यकीय बिलांची वेळेवर परतफेड व्हावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या उपचारांत अडथळे येणार नाहीत.

५) बस आगार व पीएमपीच्या आरक्षणाबाबत तसेच पीएमआरडीए (PMRDA) हिस्स्याबाबत स्पष्टता आणण्यावर भर द्यावा. 

६) नव्याने बसस्टॉप  उभारणी, डीपीमध्ये आरक्षण समावेश, जागांची आरक्षण यांची माहिती द्यावी. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories